अजितदादांचा फडणवीस – शिंदेंना धक्का; 24 तासात पिंपरी चिंचवडमध्ये फोडले 4 उमेदवार
Pimpri Chinchwad Municipal Corporation Election : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम
Pimpri Chinchwad Municipal Corporation Election : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांवर लागले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्य लढत महायुतीमधील दोन्ही घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election) भाजपची अजित पवारांसोबत (Ajit Pawar NCP) मैत्रीपूर्ण लढत होणार असून कोणतीही कटुता निर्माण केली जाणार नसल्याची माहिती माध्य्मांशी बोलताना दिली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत शहरातील भाजपच्या तीन आणि शिवसेना शिंदे गटाचा एक अशा चार माजी नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तर पुढील काही दिवसात आणखी सहा ते सात भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे (Shivsena) गटातील इच्छुकांना पक्षात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहाल यांनी दिली आहे. महायुतीमधील घटक पक्षांनी अंतर्गत फोडाफाडी करायची नाही असं ठरलंय आहे मात्र अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देत चार माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिल्याने महायुतीमध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे.
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांपैकी ठाणे, मुंबई, पुणेसह महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांसाठी युती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतला आहे मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेविरुद्ध निवडणूक लढवणार आहे.
राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
