Mothers Day Occasion Mamta Ki Kasauti program Of Star Plus : ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीच्या मालिकांमधून नेहमीच ठोस कथाकथन आणि खोलवर रुजलेले कौटुंबिक मूल्य पाहायला मिळते. ते प्रत्येक भारतीय घराशी मिळतेजुळते असते. ‘मदर्स डे’ (Mothers Day) निमित्ताने, मातेची निरपेक्ष माया, पटकन सावरण्याची वृत्ती आणि त्याग ही मूल्ये साजरी करण्यासाठी ‘स्टार प्लस’ वाहिनी येत्या रविवारी त्यांच्या लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांना एकत्र आणत ‘ममता की कसौटी’ हा कार्यक्रम (Mamta Ki Kasauti ) सादर करत आहे. हा कार्यक्रम म्हणजे मातृत्वाच्या भावनेला मनापासून वाहिलेली एक आदरांजली आहे. ती प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमधील लाडक्या पात्रांद्वारे उभ्या राहिलेल्या ठोस कथांमधून साकार करण्यात आली आहे.
ब्रेकिंग : IPL 2025 स्थगित; भारत-पाकिस्तान तणावादरम्यान BCCI चा मोठा निर्णय
‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत एका आईच्या जगात उलथापालथ होत असल्याचे आपण पाहतो, जिथे सावी प्रत्येक आईच्या मनात असलेल्या भीतीचा ती प्रत्यक्षात सामना करते. ते कारण म्हणजे सई बेपत्ता होते, ज्यामुळे ती हादरून जाते. ‘उडने की आशा’ या मालिकेत, रेणुकाचे सचिनशी वागणे सौम्य होऊ लागते, वर्षानुवर्षे त्यांच्यात जे भावनिक अंतर होते, ते नाहीसे होऊ लागते. त्याच्या संगोपनादरम्यान तिच्या अनुपस्थितीबद्द्ल आणि तिने गमावलेल्या मौल्यवान क्षणांची तिलाच जाणीव होऊ लागते, ज्या कारणामुळे त्यांच्यातील बंध नाजूक झालेले असतात. मात्र, तरीही त्यात सुधार होण्याची शक्यता निर्माण होते. ‘अनुपमा’ या मालिकेतही तीव्र भावनिकता अनुभवायला मिळते, कारण अनुपमा आणि राही यांच्या नात्याला तडे जातात, आईच्या नात्याची ताकद अजमावण्याचा हा क्षण असतो. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अभिरा मातृत्व स्वीकारते खरी, परंतु या महत्त्वाच्या दिवशी तिचा नवरा तिला मुलापासून दूर करत असल्याने तिच्या आनंदावर विरजण पडते.
‘कांतारा 2’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ज्यूनियर अभिनेता एमएफ कपिलचं निधन, काय घडलं?
‘पॉकेट में आसमान’ या मालिकेत भावनिक तिन्हीसांजेच्या काळात, राणी तिच्या मुलाला गमावण्याच्या भीतीने अतिसंरक्षणात्मक होत असल्याचे दाखवले आहे. ‘अॅडव्होकेट अंजली अवस्थी’ या मालिकेत, अंजली एका खास कार्यक्रमाचे आयोजन करून सपनाला आश्चर्यचकित करते. ज्या कार्यक्रमात संपूर्ण वस्ती एकत्र येते. आवडता शिरा बनवण्याची परंपरा कायम ठेवत असताना झनक आणि मून यांच्या नात्यात झनक एक ऊब आणते, तर ‘जादू तेरी नजर डायन का मौसम’ या मालिकेत जादुई, गूढ दुनियेचे नाट्य मातृत्वाच्या प्रवृत्तीशी मिसळते आणि अमर्याद संरक्षणाची एक रोमांचक कथा निर्माण होते.
या ‘मदर्स डे’ला, ‘स्टार प्लस’ वाहिनीने या हृदयस्पर्शी कथा ‘ममता की कसौटी’ या खास कार्यक्रमाद्वारे साजऱ्या करायचे निश्चित केले आहे. या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना आठवण करून दिली जाईल की, प्रत्येक यश, प्रत्येक हास्य आणि प्रत्येक संघर्षामागे एक आई असते, जिने आपल्या मुलाला सर्वस्व दिलेले आहे. प्रेक्षकांना या प्रत्येक मालिकेत उच्च प्रतीचे नाट्य आणि भावनांनी वेळोवेळी घेतलेली वळणे पाहायला मिळतात. स्टार प्लस वाहिनीवर येत्या रविवारी, संध्याकाळी साडे सहा ते रात्री साडे अकरा या वेळेत ‘ममता की कसौटी’ या कार्यक्रमाद्वारे मातेची शक्ती, माया आणि त्याग अनुभवायला विसरू नका.