एका हातात ब्रेस्टपंप अन् दुसऱ्या हातात शॅम्पेन; राधिकाची ही लाईफस्टाईल स्तनपान करणाऱ्या मातांसाठी योग्य?

breastfeeding mothers can consume alcohol like Radhika Aapte : बॉलीवूडमध्ये स्वतःच्या हिमतीवर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये राधिका आपटे या अभिनेत्री चे नाव आघाडीवर आहे. तसेच ती तिच्या बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जाते.
तुमची शिव्यासेना झालीय का? उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला उबाठाला टोला
नुकतच राधिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. यादरम्यान तिने केलेल्या बेबी बम्पच्या फोटो शूटवरून देखील तिला प्रचंड ट्रॉलिंगला सामोरे जावं लागलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा राधिका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. यावेळी राधिकाने BAFTA अॅवार्ड्समध्ये एका हातात बाळासाठी दूध काढण्याचा ब्रेस्टफीडिंग पंप आणि दुसऱ्या हातात चक्क शॅम्पेनचा ग्लास पकडला असल्याचा फोटो पोस्ट केला आहे.
बॉक्स ऑफिसवर छावाची सिंहगर्जना! अवघ्या चार दिवसांत कमावले तब्बल 200 कोटी
त्या पोस्टमध्ये राधिकाने लिहिलं आहे की BAFTA अवॉर्ड्स मधली माझी परिस्थिती पहा. पण मी नताशाचे आभार मानते. कारण तीच्यामुळे मी या कार्यक्रमात येऊ शकले. तिने माझी ब्रेस्ट पंपिंगची वेळ लक्षात घेऊनच माझ्या कार्यक्रमाचे नियोजन केलं. बाळासाठी दूध काढण्यासाठी ते माझ्यासोबत बाथरूममध्ये आली तसेच माझ्यासाठी शॅम्पेनही घेऊन आली. असे या कॅप्शनमध्ये राधिका वाटली तिच्या या पोस्टवर नेटकरांनी प्रचंड ट्रोल केले.
मात्र स्तनपान करणाऱ्या मातांनी मद्यपान किंवा तत्सम वस्तूंचा सेवन करणे कितपत योग्य आहे जाणून घेऊ सविस्तर…
आईचे दूध हे बाळासाठी अत्यंत आवश्यक आणि पोट भरण्यासह बाळाचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक या दुधामध्ये असतात. त्यामुळे पहिले सहा महिने जोपर्यंत बाळाचे पचन संस्था मजबूत झालेली नसते. तोपर्यंत वाचण्यास अत्यंत हलके असलेले आईचे दूधच देणे योग्य असते. मात्र या दरम्यान जर स्तनपान करणाऱ्या मातांना मद्यपान करायचे असल्यास त्यावर तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.
यावर काही तज्ञ सांगतात की, प्रसूतीनंतर मातेने अल्कोहोल पासून पूर्णपणे दूर राहायला हवं. कारण तुम्ही घेतलेलं अल्कोहोल थेट दुधाद्वारे तुमच्या बाळापर्यंत पोहोचतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही ड्रिंक्स घेता ते तुमच्या शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी कितीतरी वेळ लागतो. त्या दरम्यान तुम्ही स्तनपान करता त्याद्वारे काही प्रमाणात अल्कोहोल बाळाच्या शरीरात पोहचत त्यामुळे त्याच्या नाजूक शरीरावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.