Movies Releasing This Week 14 July: जुलैच्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात चाहत्यांचे मनोरंजनासाठी (Entertainment) खास मेजवानी मिळणार आहे. या आठवड्यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा ‘डेट भेट’ (Date Beht) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Hindi Movie) सध्या मनोरंजन विश्वामध्ये अनेक नव्या सिनेमाची आणि वेब सीरिजची भर पडत असल्याचे दिसून येत आहे.
जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात देखील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिचा ‘डेट भेट’ हा धमाकेदार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, या सिनेमाला टक्कर द्यायला काही हिंदी सिनेमा थिएटर आणि ओटीटीवर रिलीज होणार आहे. चला तर मग या आठड्यात रिलीज होणाऱ्या सिनेमाची यादी पाहूया.
डेट भेट
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणजेच चाहत्यांची लाडकी अप्सरा आणि अभिनेता संतोष जुवेकर, हेमंत ढोमे यांच्या खुमासदार अभिनयाने रंगलेला अन् प्रेमाची नवी कोरी गोष्ट सांगणारा ‘डेट भेट’ चाहत्यांच्या खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी सज्ज होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आले आहे. तेव्हाच त्याविषयीची मोठी उत्सुकता वाढली होती. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित ‘डेट भेट’ हा सिनेमा येत्या १४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
अजमेर ९२
‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाच्या कथेशी काहीसं साधर्म्य असणारा ‘अजमेर ९२’ या सिनेमाची कथा ३० वर्षांअगोदरच्या अजमेरमध्ये किशोरवयीन मुलींवर झालेल्या गुन्हेगारी हल्ल्यावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. पुष्पेंद्र सिंह दिग्दर्शित ‘अजमेर ९२’ मध्ये झरीना वहाब, सयाजी शिंदे, मनोज जोशी आणि राजेश शर्मा मुख्य भूमिकेमध्ये दिसून आला आहेत. या सिनेमाची कथा वास्तवावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. ‘अजमेर ९२’ हा सिनेमा १४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
इश्क-ए-नादान
अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिचा ‘इश्क-ए-नादान’ हा धमाकेदार सिनेमा देखील या आठवड्यात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. लारा दत्ता, नीना गुप्ता, श्रिया पिळगावकर आणि मोहित रैना यांची मुख्य भूमिका असलेला या आगामी सिनेमाची कथा लोक कोणत्याही वयात प्रेमात पडू शकतात, या सिनांतून दिसून येणार आहे. ‘इश्क-ए-नादान’ हा सिनेमा १४ जुलै रोजी जिओ सिनेमांवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?
द ट्रायल
बॉलिवूड अभिनेत्री काजोल स्टारर ‘द ट्रायल’ ही सीरिज एका गृहिणीभोवती फिरत असल्याचे दिसून येत आहेत. जी पती तुरुंगात गेल्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा लॉ फर्ममध्ये कामावर आल्याचे दिसून आले आहे. ही सीरिज रॉबर्ट किंग आणि मिशेल किंग यांच्या ‘द गुड वाईफ’ची हिंदी आवृत्ती आहे. डिस्ने+हॉटस्टारवर १४ जुलैला ‘द ट्रायल’ ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.
मिशन: इम्पॉसिबल – डेड रेकनिंग
‘मिशन: इम्पॉसिबल’ या वेबसीरिजच्या सातव्या भागामध्ये खूपच ड्रामा आणि अॅक्शन बघायला मिळणार आहे. या सिनेमात आता ही टीम धोकादायक शस्त्रे हस्तगत करण्यासाठी जगभरात प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. या मिशनमध्ये अगदी त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाल्याचे दिसून येणार आहे. ‘मिशन: इम्पॉसिबल- डेड रेकनिंग पार्ट वन’ हा एक अमेरिकन स्पाय अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात टॉम क्रूझ, हेली एटवेल, विंग रेम्स, सायमन पेग, रेबेका फर्ग्युसन, व्हेनेसा किर्बी आणि हेन्री झेर्नी यांच्या मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत.
कोहरा
‘कोहरा’ ही दोन पोलिसांची रंजक कथा आहे. जे एका अनिवासी भारतीय तरूणाच्या मृत्यूची चौकशीचा तपास करण्याचा प्रयत्न करत असतात. हा तरुण त्याच्या लग्नाच्या काही दिवस अगोदरच मृतावस्थेत आढळतो. ‘कोहरा’ १५ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. यामध्ये बरुण सोबती, सुविंदर विकी, हरलीन सेठी, मनीष चौधरी, वरुण बडोला आणि रॅचेल शेली हे मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.