Download App

छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण…

Dharmrakshak Ahilyadevi Holkar : इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये अजरामर झालेली बरीच कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे अलीकडच्या काळात रुपेरी पडद्यावर

Dharmrakshak Ahilyadevi Holkar : इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये अजरामर झालेली बरीच कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे अलीकडच्या काळात रुपेरी पडद्यावर अवतरलेली पाहायला मिळाली आहेत. या व्यक्तिरेखांच्या आधारे इतिहासातील सुवर्ण अध्याय आजच्या पिढीसमोर आले आहेत. आपल्या पराक्रमाने इतिहास गाजवणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांपैकी एक महाराणी अहिल्याबाई होळकर (Dharmrakshak Ahilyadevi Holkar) होत्या. इ. स. 1767 ते इ. स. 1795 या काळात राज्य करणाऱ्या भारतातील माळव्यातील तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाईंची कहाणी चित्रपट रूपात जगासमोर येणार आहे.

‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर – एक युग’ या चित्रपटात शूर पराक्रमी महाराणींची यशोगाथा पाहायला मिळणार आहे. 23 मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नितीन धवने फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ या चित्रपटाची निर्मिती निर्माते सोमनाथ शिंदे यांनी लयभारी प्रोडक्शनच्या बॅनरखाली केली आहे. नितीन धवने पाटील या चित्रपटाचे सह निर्माते तसेच प्रस्तुतकर्ते आहेत. लेखक-दिग्दर्शक सुशांत सोनवले यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करत रसिकांना सतराव्या शतकात नेण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज लोकनेते व माजी लोकसभा सदस्य मा. खा. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक, कलाकार राहुल राजे, सुहास जाधव, संदेश कदम व तंत्रज्ञांची टिम उपस्थित होती. ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’च्या संपूर्ण टिमचे कौतुक करत मा. खा. छ. उदयनराजे भोसले यांनी चित्रपटाला भरभरून शुभेच्छा दिल्या.

या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक सुशांत सोनवले म्हणाले की, इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील पराक्रमी व्यक्तिरेखा आजच्या पिढीसमोरच नव्हे, तर सदा सर्वकाळ आदर्श निर्माण करणाऱ्या आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने एका लढाऊ महाराणीची शौर्यगाथा जगासमोर येणार आहे. महाराष्ट्राला जशी थोर संतांची आणि पराक्रमी वीरांची परंपरा लाभली आहे तशीच अहिल्याबाईंसारख्या रणरागिणींचीही परंपरा आहे. हा चित्रपट केवळ एक कलाकृती नव्हे, तर अहिल्याबाईंच्या चरित्रगाथेचे डॅाक्युमेंटेशन ठरावे, अशी भावनाही दिग्दर्शक सुशांत सोनवले यांनी यावेळी व्यक्त केली. चित्रपट-मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने या चित्रपटात अहिल्याबाईंची व्यक्तिरेखा साकारली आहे.

प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरवर अश्विनीच्या रूपातील अहिल्याबाईंचा लढाऊ बाणा पाहायला मिळतो. याखेरीज चित्रपटातील इतर महत्त्वाच्या व्यक्तिरेखाही ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’च्या पोस्टरवर आहेत.

सर्वात मोठी बातमी, रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

या चित्रपटात अश्विनी महांगडेच्या जोडीला राहुल राजे, सुहास जाधव, संदेश कदम, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, संजय खापरे, सुनील गोडसे, संजीवनी जाधव, शिवा रिंदानी आदी कलाकार आहेत. चित्रपटातील गीते गुरू ठाकूर आणि प्रियंका शेडगे यांनी लिहीली असून, संगीत शुभम पाटणकर यांनी दिले आहे. यातील नंदेश उमप यांच्या पहाडी आवाजातील पोवाडा वीररस जागवणारा आहे. याखेरीज सागर भोसले यांनीही या चित्रपटातील गीते गायली आहेत. संकलन ओम पाटील यांनी केले असून, डीआय विनोद राजे यांनी केले आहे. सलमान मुलानी आणि सुनीत व्यास यांनी व्हिएफएक्सचे काम केले आहे. दादा शिंदे व धनाजी शिंदे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

follow us

संबंधित बातम्या