सर्वात मोठी बातमी, रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

सर्वात मोठी बातमी, रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

Rohit Sharma : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून रोहित शर्माने (Rohit Sharma) याबाबत माहिती दिली आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रोहित आता फक्त भारतासाठी वनडेमध्ये खेळताना दिसणार आहे. 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 निवृत्ती घेतली होती.

WhatsApp Image 2025 05 07 At 7.46.35 PM

निवृत्तीबाबत माहिती देताना रोहित शर्माने सोशल मीडियावर लिहिले आहे की, सर्वांना नमस्कार, मी फक्त हे सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी एक सन्मान आहे. गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहीन. असं रोहित शर्माने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

भारतासाठी रोहितने 67 कसोटी सामने खेळले असून 12 शतकांसह एकूण 4302 धावा केल्या आहेत. पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्मा  भारतीय संघाचा नेतृत्व करणार असल्याची चर्चा जोराने सुरु होती मात्र अचानक रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला आहे. भारतीय संघ 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने आता या दौऱ्यावर भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण असणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

कर्नल सोफिया कुरेशीची जगभरात चर्चा; जाणून घ्या, कुठेच वाचनात न आलेल्या खास गोष्टी…

घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुध्द झालेल्या मालिकेत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माचा फॉर्म खराब असल्याने त्याच्यावर चारही बाजूने टीका होत होती. यानंतर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा सुरु झाली होती मात्र तेव्हा मी निवृत्ती जाहीर करणार नाही अशी माहिती रोहित शर्माने पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube