MTV Roadies Season 19 : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो एमटीव्ही रोडीज सीझन 19 हा होस्ट करताना दिसणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या शोद्वारे अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील कमबॅक करणार आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया अडचणीत सापडली होती. त्यांनतर गेले अनेक दिवस ती सिनेसृष्टीपासून दुरावली होती.
दरम्यान एमटीव्ही रोडीज हा प्रसिद्ध शो आहे. चंदीगड, नवी दिल्ली, इंदूर आणि पुणे या चार शहरांमध्ये या शोसाठी ऑडिशन घेण्यात आले होते. या सर्वांनंतर आता निर्मात्यांनी अॅक्शन-पॅक शोचा प्रोमो शेअर केला आहे. या शोमध्ये प्रिन्स नरुला, गौतम गुलाटी आणि रिया चक्रवर्ती गँग लीडर म्हणून दिसू शकतात.
नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आपण पहिले तर याठिकाणी प्रत्येकजण वेगळ्या अवतारात दिसू राहिला आहे. विशेष म्हणजे प्रोमो व्हिडिओमधला प्रत्येकाचा लूकही खूपच इंटरेस्टिंग आहे. शोचा होस्ट सोनू सूदने फ्युचरिस्टिक डिझाइनचा फुल बॉडी आर्मर सूट परिधान केला आहे.
व्हिडिओ मेटल एज रणांगणावर आधारित आहे, ज्यामध्ये तीन टोळीचे नेते एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात. प्रोमोमध्ये, टोळीच्या नेत्यांना लढाईसाठी पूर्ण तयारी दर्शविली आहे, ते कर्म आणि कांड यांच्यातील लढाईत त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी त्यांचे सामर्थ्य आणि लढाऊ कौशल्य दाखवतात, कारण या हंगामाची थीम ‘कर्म या कांड’ आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक कुख्यात गँगस्टर संपवला
यामधील कलाकारांविषयी बोलायचे झाले तर यातील स्पर्धक प्रिन्स नरुला रोडीज 12 चा विजेता होता आणि तो स्प्लिट्सविला 8, बिग बॉस 9 आणि इतर टीव्ही शोमध्ये देखील दिसला होता. गौतम गुलाटी हा बिग बॉस 8 मधील त्याच्या खेळासाठी ओळखला जातो. याशिवाय रिया चक्रवर्तीबद्दल सांगायचे तर ती ‘जलेबी’ आणि ‘चेहरे’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. ‘रोडीज – कर्म या कांड’ 3 जून रोजी एमटीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रसारित होणार आहे.