हृदयात खोलवर उतरणारी प्रेमकहाणी! मृणाल-सिद्धांतच्या ‘दो दीवाने सहर में’चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज

Do Deewane Sahar Mein च्या अनोख्या फर्स्ट लुकनंतर आता झी स्टुडिओज आणि भन्साली प्रोडक्शन्सची आगामी फिल्म टीझरद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Do Deewane Sahar Mein

Do Deewane Sahar Mein

Much-awaited teaser of Mrunal-Siddhant’s ‘Do Deewane Sahar Mein’ is out : झी स्टुडिओज आणि भन्साली प्रोडक्शन्सची आगामी फिल्म ‘दो दीवाने सहर में’ तिच्या अनोख्या फर्स्ट लुकनंतर आता टीझरद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा वन-ऑफ-ए-काइंड रोमँटिक ड्रामा एका अशा प्रेमकथेची झलक दाखवतो, जी अत्यंत रिअल, अनपेक्षित आणि थेट मनाला भिडणारी आहे. जिथे फर्स्ट लुकने दोन अपूर्ण व्यक्तींमधील परफेक्ट प्रेमाचं स्वप्न दाखवलं होतं, तिथे हा टीझर एका मॉडर्न रोमँसचं वचन देतो—जणू एखादी जुनी आठवण, जी आपण नकळत मनात जपून ठेवलेली असते.

मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय; मराठी अस्मितेच्या चर्चेत नवा राजकीय मुद्दा

मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर या चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला असून, पहिल्याच फ्रेमपासून तो रिअल रोमँसची भावना निर्माण करतो. ‘अजून-पूर्ण-न-झालेलं प्रेम’, प्रेमाच्या शक्यता आणि भावनिक गुंतागुंतींचा हा प्रवास प्रेक्षकांना वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातो. टीझरला आणखी खास बनवतो निर्मात्यांचा ऑथेंटिक टच. आयकॉनिक गाणं ‘दो दीवाने सहर में’ बॅकड्रॉप म्हणून वापरण्यात आलं असून, त्याची भावस्पर्शी धून चित्रपटाच्या शांत, सोज्वळ प्रेमकथेला सुंदरपणे पूरक ठरते.

ब्रेकिंग : महापौर आरक्षण सोडतीचा मुहूर्त ठरला; वेळ, ठिकाणाबाबत अधिसूचना निघाली

सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांची केमिस्ट्री विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. दोघेही असे पात्र साकारताना दिसतात, जे स्वतःला समजून घेण्याच्या प्रवासात आहेत—आणि अशी प्रामाणिक मांडणी प्रेमकथांमध्ये क्वचितच पाहायला मिळते. सच्चा रोमँस आणि भावनिक खोली यामुळे ही जोडी या वर्षातील सर्वात हृदयस्पर्शी ऑन-स्क्रीन पेअरिंग्सपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.

उत्तम कथा, स्टारकास्ट मानसी नाईकचा “मन आतले मनातले” ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

टीझर रिलीज होताच आता ट्रेलरची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही फिल्म त्या प्रेक्षकांसाठी व्हॅलेंटाईन गिफ्टसारखी ठरणार आहे, ज्यांचा विश्वास आहे की प्रेम थोडं गुंतागुंतीचं, कन्फ्यूजिंग असतं—पण तरीही पूर्णपणे वर्थ इट. हा चित्रपट तुम्हाला काय वाटावं हे सांगत नाही, तर तुम्हाला ते स्वतः अनुभवण्याची संधी देतो.

मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रेमकथेचा नवा अध्याय “सहवास”, चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

झी स्टुडिओज आणि भन्साली प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘दो दीवाने सहर में’ या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन रवि उदयावर यांनी केलं असून, संजय लीला भन्साली, प्रेरणा सिंह, उमेश कुमार बन्सल आणि भरत कुमार रंगा यांनी रवि उदयावर फिल्म्सच्या सहयोगाने निर्मिती केली आहे.‘दो दीवाने सहर में’ हा चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

 

Exit mobile version