Mukesh Chhabra’s Gudgudi Select for Cannes He thanked the audience saying that it was a dream come true : धुरंधर चित्रपटाचे कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या गुडगुडी चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिवल 2026 च्या मंचावर स्क्रीनिंगसाठी निवडले गेले आहे. यामध्ये अहसास चन्ना हा अभिनेता मुख्य भूमिकेत आहे. हा कान्स फिल्म फेस्टिवल सोहळा 12 ते 23 मे दरम्यान रंगणार आहे.
ट्रम्प यांचा मोदींना फोन, होर्मुज खुली करण्यावर चर्चा झाली? ट्रम्प यांचा मोठा खुलासा…
या बाबत मुकेश छाब्रा यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, गुडगुडी हा आमचा आणखी एक चित्रपट कान्सच्या वाटेवर आहे. तसेच ही बातमी तुमच्याशी शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमच्या टीमचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. यासाठी प्रेक्षकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास, पाठिंबा आणि आमच्यावरील तुमचे प्रेम यासाठी खूप खूप धन्यवाद.
साई पल्लवी यांच्या साधेपणावर चाहते फिदा
आमिर खान प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘एक दिन’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांसमोर एक सुंदर, मनाला भिडणारी प्रेमकथा घेऊन येणार आहे. साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत झळकत असून, या चित्रपटाची उत्सुकता आधीपासूनच शिगेला पोहोचली आहे. गाण्यांमधून आधीच एक खास वातावरण निर्माण केल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, जो आशा आणि जादूने भरलेली प्रेमकथा अत्यंत सुंदरपणे सादर करतो.
