“Mukkam Post Devache Ghar” selected by the government for GIFF’s “Film Bazaar – 2025” : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील “फिल्म बाजार” विभागासाठी राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत दरवर्षी मराठी चित्रपटांची निवड करून ते पाठविण्यात येतात. यंदा “फिल्म बाजार – 2025” करिता “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या मराठी चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केली आहे .
कीमाया प्रॉडक्शनचे महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल यांनी “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटाची निर्मिती केली असून संकेत माने यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.” या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय ? आणि ते कुठे असतं? याचा शोध सुरू होतो. त्याबरोबरच तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे भावनिकतेची किनार असलेल्या या कथानकाची मांडणी अतिशय हलक्याफुलक्या, रंजक पद्धतीनं करण्यात आली आहे.
‘या’ राशीसमोर समस्येचा डोंगर तुमच्या राशीचे काय? जाणून घ्या आजचं राशिभविष्य…
गेल्या दहा वर्षांपासून मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळावे आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म बाजार व गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म बाजारात सहभाग घेतला जात आहे.
