Salman Khan : बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिस अलर्ट; सलमानच्या सुरक्षेचा घेणार आढावा

Lowrence Bishnoi Threat to Salman Khan :  बॉलिवुडचा भाईजान म्हणून  ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान ( Salman Khan )  याच्या चौकशीचा आढावा मुंबई पोलिस घेणार आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची काल एका वृत्त वाहिनीने मुलाखत दाखवली होती. यानंतर ही सुरक्षा व्यवस्था वाढवायची का? याबाबत मुंबई पोलिस विचार करत आहेत. गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याने काल एका वृत्तवाहिनीला […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 15T142505.142

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 15T142505.142

Lowrence Bishnoi Threat to Salman Khan :  बॉलिवुडचा भाईजान म्हणून  ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान ( Salman Khan )  याच्या चौकशीचा आढावा मुंबई पोलिस घेणार आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची काल एका वृत्त वाहिनीने मुलाखत दाखवली होती. यानंतर ही सुरक्षा व्यवस्था वाढवायची का? याबाबत मुंबई पोलिस विचार करत आहेत.

गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याने काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने सलमान खानला धमकी दिली आहे. आम्ही त्याचा अहंकार तोडल्याशिवाय राहणार नाही. त्याने परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे, असे तो म्हणाला आहे. या मुलाखतीनंतर मुंबई पोलिस अलर्ट झाले आहेत. त्यांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे.

सत्तासंघर्षाच्या सुनावणीत राज्यपालांच्या भूमिकेवर सरन्यायाधीशांनी केली प्रश्नांची सरबत्ती

सलमान खाने याने काळ्या हरिणाला मारल्याने आमचा समाज नाराज झाला आहे. त्याने लोकांची समोर येऊन माफी मागावी अन्यथा त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे बिश्नोईने म्हटले आहे. सलमान खान याने आत्तापर्यंत आमच्या समाजाची माफी मागितलेली नाही. माझ्या मनात त्याचाप्रती लहाणपणापासून राग आहे. आम्ही त्याचा अहंकाराला तोडणारच, असे तो म्हणाला आहे.

तसेच सलमान खानला आमच्या देवाच्या मंदिरात येऊन माफी मागावी लागेल. त्याने आमच्या समाजातील लोकांना पैसे देखील देऊ केले होते. आम्ही सलमान खानला मारणे हे आमचे ध्येय आहे, असेही बिश्नोईने आपल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Devendra Fadanvis : शिंदेंनी सांगितलं की मी लगेच ऐकतो; विधानसभेत फडणवीसांची जोरदार बॅटिंग

दरम्यान, लॉरेंस बिश्नोईने याआधी देखील सलमान खानला मारण्याची धमकी दिलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सलमानला सध्या Y कॅटेगिरीची सुरक्षा दिली आहे. ती वाढवून Z किंवा X कॅटेगिरीची सुरक्षा देण्यात यावी का? याबाबत पोलिस विचार करत आहेत.

 

Exit mobile version