Devendra Fadanvis : शिंदेंनी सांगितलं की मी लगेच ऐकतो; विधानसभेत फडणवीसांची जोरदार बॅटिंग
Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभेत जोरदार बॅटींग केली आहे. यावेळी ते राज्याच्या अर्थसंकल्पावर भाष्य करत होते. याआधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार व अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प फक्त निवडणुकीच्या अनुषंगाने तयार केलेला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
शेतकरी सन्मान योजने अंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळत होते आणि आता राज्य शासनाने अर्थसंकल्पातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनद्वारे 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्या बरोबर होते. तेव्हा त्यांनी ही सुचना मांडली होती. पण तुम्ही ऐकले नाही. मी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की लगेच ऐकतो, असे म्हणत फडणवीसांनी विधानसभेत जोरदार बॅटींग केली आहे.
Devendra Fadanvis : शिंदेंनी सांगितलं की मी लगेच ऐकतो; विधानसभेत फडणवीसांची जोरदार बॅटिंग
या अर्थसंकल्पावर बोलताना अजित पवारांनी खरमरीत टीका केली होती. भाजप आमदारांना महाप्रसाद, शिंदे गटाला प्रसाद तर विरोधी आमदारांना फक्त पंचामृत दिल्याचे अजितदादांनी म्हटले होते. त्यावर देखील फडणवीसांनी भाष्य केले आहे. आमच्या अर्थसंकल्पातून सर्वांना पंचामृत मिळाल आहे. पण तुमच्या सरकारच्या काळात कोरोनामध्ये कोणते अमृत चालू होते हे सर्व कोणासाठी चालू होते, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
https://letsupp.com/maharashtra/h3n2-virus-in-maharashtra-dr-ravi-godse-told-histry-of-virus-24017.html
तसेच शिवसेना ज्यावेळी तुमच्या सोबत सत्तेत होती तेव्हा 2020-2021 च्या अर्थसंकल्पामध्ये शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असून देखील त्यांना फक्त 15 टक्के निधी दिला होता. आता ते आमच्याबरोबर तेव्हा त्यांना 34 टक्के निधी मिळाला आहे, असे म्हणत फडणवीसांनी पवारांना सुनावले आहे.