Salman Khan Firing Case : बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) मारण्याचा कट रचण्यात आला होता. भाईजानच्या घरावर एप्रिल महिन्यात गोळीबार करण्यात आला होता. ( Bishnoi gang) बिष्णोई गँगने केलेल्या या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तपासाचे सूत्र हातात घेत आरोपींना अटक करण्यात आली होती. त्याचवेळी नवी मुंबई पोलिसांनी देखील काही आरोपींना अटक केली होती. मात्र आता या प्रकरणाविषयी मुंबई पोलिसांनी थेट आरोपपत्र दाखल केले असून बिष्णोई गँगच्या या हल्ल्याचा कट समोर आला आहे.
भाईजानच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिष्णोई टोळीने भाईजानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे.
या ठिकाणाहून शस्त्रांची आयात
पाकिस्तान आणि तुर्कीमधून एके 4, एके 92 आणि एम 16 ही शस्त्रे विकत घेत संपूर्ण प्लॅनिंग करण्यात होती. शिवाय, गायक सिद्धू मुसावाला याची हत्या ज्या शस्त्राने करण्यात आली होती, तेच मेड इन तुर्की शस्त्र देखील खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या काळात भाईजानच्या हत्येचा कट
या कालावधीत भाईजानच्या हत्येचा कट आखण्यात आला होता, असे पोलिसांनी आरोपपत्रात सांगितले आहे. पोलिसांनी सांगितले की, जवळपास 60 ते 70 लोक भाईजानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलेले होते. हे सर्वजण सलमान खानचे मुंबईतील घर, पनवेलच्या फार्म हाऊस आणि गोरेगावमधील फिल्म सिटी येथील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलेले होते.
Salman Khan Firing Case: बिश्नोई ब्रदर्सला का करायचाय सलमानचा गेम?
अल्पवयीन मुलांची निवड…
पोलिसांनी पुढे सांगितले आहे की, आरोपींनी भाईजानला जीवे मारण्यासाठी 18 वर्षांखालील मुलांना निवड केली आहे. पोलिसांनी असेही सांगितले की सर्व शूटर्स गोल्डी ब्रा आणि अनमोल बिश्नोई याच्या इशाराची वाट पाहत होते. आदेश मिळताच त्यांनी पाकिस्तानमधून आणलेल्या शस्त्रांचा वापर करून भाईजानवर हल्ला केला असता. हे शूटर पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी राहायला होते, अशी माहिती समोर आली आहेृ.
भाईजानची हत्या केल्यानंतर आरोपी ‘या’ ठिकाणी पळ काढणार होते…
पोलिसांनी आरोपपत्रात असेही सांगितले आहे की, भाईजाची हत्या केल्यानंतर आरोपींनी परदेशात पळ काढण्याचा कट आखला होता. भाईजानची हत्या झाल्यानंतर सर्व आरोपी हे कन्याकुमारीला या ठिकाणी जमणार होते. त्यानंतर ते पुढे एका बोटीने श्रीलंका या ठिकाणी जाणार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे.