मोठी बातमी : …अन्यथा सलमान खानसारखं प्रकरण करू; जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगची धमकी

  • Written By: Published:
मोठी बातमी : …अन्यथा सलमान खानसारखं प्रकरण करू; जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगची धमकी

मुंबई : सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबाराची घटना ताजी असतानाचा आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Aawhad ) बिश्नोई गँगच्या नावानं धमकी देण्यात आली आहे. पैसे पाठवा अन्यथा सलमान खानसारखं (Salman Khan) प्रकरण करू अशी धमकी आव्हाडांना फोनवर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या धमकीनंतर आता बिश्नोई गँगच्या रडारवर आव्हाड आले असून, त्यांच्याकडे लाखो रूपयांची खंडणी मागणी करण्यात आली आहे. आव्हाडांना रोहित गोदरा नावाच्या व्यक्तीने फोन करत पैशांची मागणी केली आहे. पैसे न पाठवल्यास सलमान खान सारखं प्रकरण करू अशी धमकी देण्यात आली आहे. हा फोन हा फोन ऑस्ट्रेलियातून आला आहे. (Jitendra Aawhad Get Threat From Lawrence Bishnoi Gang )

Salman Khan Firing Case: बिश्नोई ब्रदर्सला का करायचाय सलमानचा गेम?

सलमान खान गोळी प्रकणात दोघांना गुजरातमधून उचललं 

रविवारी (दि. 14) पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर दुचाकीवरून आलेले दोघे शूटर फरार झाले होते. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोईच्या भावाने घेतली होती. गोळीबार झाला तेव्हा सलमान खान घरातच होता. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी खबरदारी घेत त्याच्य घराबाहेर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे.या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तापासाची चक्रे फिरवत अवघ्या 48 तासांच्या आत गोळीबार करणाऱ्या दोन व्यक्तींना गुजरातच्या भूजमधून अटक करत त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

Salman Khan House Firing आरोपींना कसं ट्रेस केलं? मुंबई पोलिसांनी सांगितला A To Z घटनाक्रम

भाईजानच्या घराजवळ गोळीबारासाठी  7.6 बोअरची बंदूक  

सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. गोळीबारासाठी आरोपींकडून 7.6 बोअरच्या बंदुकीचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती. तसेच पोलिसांनी घटनेनंतर आरोपींची दुचाकीही जप्त केली आहे. घटनेनंतर हल्लेखोर पनवलेमध्ये थांबले होते. तसेच हल्लेखोर काही दिवसांपूर्वी हरिग्राम येथील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन वास्तव्यास होते. तेथील घर मालकाशी केलेल्या करारनाम्याच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी नवीन पनवेलमधील एका दुचाकी शोरूममधून गाडी विकत घेतली व त्यासाठीसुद्धा त्यांनी तेच कागदपत्रे दिले होते असेही समोर आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube