बाबा सिद्दीकींच्या हत्येचं मोठं रहस्य उघड; १७ लाखांच्या सुपारीत युपी अन् महाराष्ट्राचा…

  • Written By: Published:
बाबा सिद्दीकींच्या हत्येचं मोठं रहस्य उघड; १७ लाखांच्या सुपारीत युपी अन् महाराष्ट्राचा…

Baba Siddiqui Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddhiqui) यांच्या हत्या प्रकरणातील मनी ट्रेलबाबत मुंबई गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. सिद्दीकी यांच्या हत्येसाठी देशाच्या विविध भागातून निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुंबई गुन्हे शाखेने म्हटले आहे. सिद्दीकी यांच्या हत्येसाठी देण्यात आलेल्या १७ लाख रुपयांच्या सुपारीमध्ये सर्वाधिक निधी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून आल्याचे गुन्हे शाखेने आरोपपत्रात म्हटले आहे.

हो, आपण गाफिल राहिलो म्हणूनच…; पवारांकडून जाहीर कबुली अन् संघाच्या कामचं कौतुक

सर्वाधिक फंडिंग महाराष्ट्र-उत्तर प्रदेशातून

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासादरम्यान फंडिंगबाबत समोर आलेल्या तपासातून सर्वाधिक फंड महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून देण्यात आला आहे. तसेच दोन्ही राझ्यातील लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित लोकांनी अनमोल बिश्नोई आणि शुभम लोणकर यांच्या सांगण्यावरून कर्नाटक बँकेत उघडलेल्या खात्यांमध्ये पैसे जमा केल्याचे म्हटले आहे. बाबा सिद्दिकीच्या हत्येसाठी देण्यात आलेल्या सुपारीच्या रकमेपैकी काही पैसे हवालाद्वारे आरोपींपर्यंत पोहोचल्याचेही तपासात समोर आले आहे.

‘…नंतर समजलं मी चोराकडेच आलेय’; धनंजय मुंडेंवर सारंगी महाजनांचे गंभीर आरोप

आरोपपत्रानुसार, गुजरातमधील आणंद येथील कर्नाटक बँकेत आरोपी सलमान वोहरा याच्या नावाने उघडलेल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची जबाबदारी शुभम लोणकरला देण्यात आली होती. तर उत्तर प्रदेशमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा स्लीपर सेल वेगवेगळ्या सीडीएम (कॅश डिपॉझिट मशिन्स) वापरून अटक आरोपींच्या बँक खात्यात पैसे पाठवत होता.

Video : अरे तुझं वजनच 35 किलो अन् म्हणतोयं घरात घुसून… हाकेंची गाडी जरांगेंवर सटकली

देशाच्या विविध भागांतून पैसे जमा झाले

एका अधिकाऱ्याने सांगितले की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी देण्यात आलेल्या 17 लाखांच्या सुपारीच्या रकमेपैकी सुमारे 60 ते 70 टक्के रक्कम ही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमधून देण्यात आली होती. याशिवाय देशाच्या विविध भागातूनी पैसे पुरवण्यात आल्याचेही आरोपपत्रात नमुद करण्यात आले आहे. मात्र, या ह्त्येत परदेशातून फंड पाठवण्यात आला होता का? याबाबत कोणताही सुगावा तपासात सापडलेला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube