मोठी बातमी, माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा मारेकरी पंजाब पोलिसांच्या अटकेत

मोठी बातमी, माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा मारेकरी पंजाब पोलिसांच्या अटकेत

Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार या हत्येतील आरोपीला जालंधरमधुन अटक करण्यात आली आहे. या आरोपीला भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट प्रकरणात  अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. झिशान अख्तर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.

माहितीनुसार, पंजाब पोलिसांनी भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट केल्या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी एक आरोपी झिशान अख्तर आहे. झिशान बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात फरार आरोपी असून मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. पंजाब पोलिसांनी झिशानला अटक केल्याने मुंबई पोलीस त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे. झिशान बिश्नोई गँगशी संबंधित अनेक गुन्ह्यात सहभागी असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे मात्र झिशान अख्तर फरार झाल्याने मुंबई पोलीस त्याच्या शोध घेत होती. मात्र आता त्याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याने लवकरच मुंबई पोलीस त्याचा ताबा घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे. झिशान अख्तर याला अटक करण्यात आल्याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू, रायगड प्रकरणात सुनिल तटकरे भडकले 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube