रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू, रायगड प्रकरणात सुनिल तटकरे भडकले

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू, रायगड प्रकरणात सुनिल तटकरे भडकले

Sunil Tatkare On Gaurang Gaiker Case : रायगड (Raigad) जिल्हयात दुर्दैवाने घडलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात गौरांग गायकर (Gaurang Gaiker) या 14 वर्षाच्या विद्यार्थाला ताप आला म्हणून म्हसळयाच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला होता. तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी माणगाव (Mangaon) उपजिल्हा रुग्णालयात पाठवले होते. मात्र ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी त्यादिवशी आले नव्हते. तिथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांने तपासणी केली. त्याला फारसं काही न सांगता तु घरी जा असा सल्ला त्याला व नातेवाईकांना दिला तोही रात्री दीड – दोन वाजता. मात्र दुर्दैवाने सकाळी पुन्हा ताप आला आणि काही क्षणात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा त्या रुग्णालयाचा हलगर्जीपणा आहे. या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. एका 14 वर्षाच्या विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू केवळ त्यांच्या पालकांपुरता सिमीत नाही तर सडलेल्या आरोग्य यंत्रणेचे द्योतक आहे असा गंभीर आरोप सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना केला.

या प्रकरणात पुढे बोलताना खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, गेली 40  वर्ष मी या जिल्हयात जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे हे सांगतानाच सरकारने ताबडतोब या घटनेची चौकशी केली पाहिजे आणि जे वैद्यकीय अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणीही केली.

तर श्रीवर्धन येथील दुसर्‍या घटनेबाबत बोलताना आमदार अनिकेत तटकरे व अदिती तटकरे यांनी कार्डीओ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. त्या रुग्णवाहिकेचा पाटा तुटलेला होता. त्यामुळे ती 15 दिवस बंद आहे. याबाबत प्रभारी सिव्हिल सर्जन, श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी बोलणं झालं मात्र हा हलगर्जीपणा असून याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करतानाच याकडे आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीही लक्ष द्यावे आणि आरोग्य यंत्रणा ज्यापद्धतीने काम करत आहे ती आम्हा सर्वांच्या दृष्टीने लांच्छानास्पद आहे असे उद्विग्न होत सुनिल तटकरे यांनी मत व्यक्त केले .

प्रकरण काय?

गौरांग गायकर याला  पायावर केस पूळी आल्याने  शुक्रवारी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेल्यात आले होते. शनिवारी त्याला अचानक अचानक ताप भरल्याने रात्री 10.30 च्या सुमारास त्याला उचारासाठी पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते . गौरांग याला ताप जास्त असल्याने  डॉक्टरांनी सलाईन लाऊन त्याला स्टेबल केले व पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

राज्य सरकारचा मोठा निर्णय, घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी 5 ब्रासपर्यंत वाळू मोफत मिळणार

म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने गौरांगला रात्री 1 वाजेपर्यंत माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र तिथे डॉक्टरांनी विनाउपचार करता गौरांगला घरी पाठवले घरी आल्यावर त्याच्या अचानक मृत्यू झाला .

follow us
  • fb
  • instagram
  • youtube