हितचिंतकांनी खोटा प्रचार केला पण भाजप …, सुनिल तटकरेंनी विरोधकांना सुनावलं
Sunil Tatkare : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) महत्व कमी झाले असून लवकरच अजित पवार (Ajit Pawar) महायुतीमधून बाहेर पडणार असल्याचे बातम्या आमच्या हितचिंतकांनी देण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपकडून (BJP) मित्रपक्षांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात येते त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे माझी केंद्रीय समिती अध्यक्ष पदावर निवड अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी विरोधकांना सुनावले.
सुनिल तटकरे यांची केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यनंतर आज (28 सप्टेंबर) सुनिल तटकरे यांचा प्रदेश कार्यालयात ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, केंद्राकडून मला जी समिती देण्यात आली आहे, त्याची जबाबदारी फार मोठी आहे. त्या समितीच्या कामकाजाबद्दल आता सर्व सांगणे योग्य नाही कारण ही समिती लोकसभेच्या अखत्यारीत येते असं सुनील तटकरे म्हणाले. तसेच या समितीचे काम योग्यरीत्याने करण्याचे सातत्य माझ्याकडून ठेवले जाईल असेही सुनील तटकरे म्हणाले.
पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, आपल्या राज्यात जी विविध महामंडळे आहे त्यावर योग्य ती कार्यवाही सुरु आहे. निवड करण्यास विलंब झाला असला तरी काही दिवसातच माझ्या महत्वाच्या सहकार्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. असा विश्वास देखील माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
‘माविआ’ मध्ये गृहकलह, ठाकरेंना फक्त 44 जागा, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, मुंबई युवक अध्यक्ष सुनिल गिरी, पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे सदस्य सुदर्शन सांगळे, मनिषा तुपे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.