आमदार आशुतोष काळे उद्या भरणार अर्ज; सुनिल तटकरे अन् सयाजी शिंदेंची असणार उपस्थिती

आमदार आशुतोष काळे उद्या भरणार अर्ज; सुनिल तटकरे अन् सयाजी शिंदेंची असणार उपस्थिती

Mla Aashutosh Kale : कोपरगाव मतदारसंघाचे (Kopargoan Assembly Constituency) आमदार आशुतोष काळे (Aashutosh Kale) उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंसह राष्ट्रवादीचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असं आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी केलंय.

लाजिरवाणी परिस्थिती निर्माण करू नका : सुप्रीम कोर्टात ‘घड्याळा’ वरून खडाजंगी, दादांना कडक सूचना

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून येत्या 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून आशुतोष काळे यांना उमेदवारी जाहीर झालीयं. आशुतोष काळे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या कोपरगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरुन सकाळी 11 वाजता शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यावेळी आंबेडकर मैदान ते तहसील कार्यालयापर्यंत प्रचार रॅली काढण्यात येणार असून रॅलीसाठी महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असं आवाहन सिनगर यांच्याकडून करण्यात आलंय.

सरकार घालवण्यासाठी जनता सुसज्ज ; इस्लामपूरमधून शक्तिप्रदर्शन करत जयंत पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज

दरम्यान, आशुतोष काळे महायुतीत आल्याने कोपरगावच्या जागेचा पेच निर्माण झाला होता. भाजपकडून या मतदारसंघातून विवेक कोल्हे हेही दावेदार होते. पण भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याने कोल्हेंनी काही दिवसांपासून शरद पवार यांच्याशी जवळीक वाढविली होती. त्यांनी पुण्यात पवार यांची भेटही घेतली होती.
तेव्हापासून त्यांचा महाविकास आघाडीत प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरु झाली होती. बाळासाहेब थोरात यांनीही विवेक कोल्हे यांना गळाला लावण्यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र, कोल्हे यांचा प्रभाव केवळ कोपरगाव मतदारसंघावर नाही. त्यामुळे त्यांची नाराजी आणि पक्ष सोडून जाणे परवडणारे नाही, हे ओळखून देवेंद्र फडणवीस मागील अनेक दिवसांपासून कोल्हे यांची मनधरणी करत होते. अखेर कोल्हेंनी थेट केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेत, कोपरगावच्या जागेचा वाद मिटवलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube