सरकार घालवण्यासाठी जनता सुसज्ज ; इस्लामपूरमधून शक्तिप्रदर्शन करत जयंत पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज
NCP Jayant Patil filed nomination form In Islampur constituency : राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहतंय. राजकीय पक्षांचे उमेदवार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीने इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उमेदवारी दिलीय. आज त्यांनी इस्लामपूरमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तुतारी चिन्हावर जयंत पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत.
पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत काहीही बदल वाटत नाही. जोर कायम आहे. आता आपण सगळे एका नव्या वळणावर आलोय. ही निवडणूक सत्तापरिवर्तन करणारी आहे. तुमच्या एका मतात सरकार बदलण्याची ताकद आहे. सहकारी जीवाची बाजी लावतील, मागच्या पेक्षा जास्त विजय खेचून आणतील असा विश्वास जयंत पाटलांनी म्हटलंय. या निवडणुकीत तुम्हाला सगळे प्रकार बघायची संधी मिळेल. वाममार्गाचा वापर होईल, देशातील अनेक नेते इथे येवून मार्गदर्शन करतील. मला थांबवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी टीका जयंत पाटलांनी केलाय.
सगळ्या लोकांपर्यंत आपलं चिन्ह पोहोचणं गरजेचं आहे. मतं मिळविण्यासाठी काही लोकं सगळे मार्गांचा अवलंब करीत आहेत. राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, याकडे लक्ष असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारण बदललेलं दिसेल, असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केलाय. तुतारी वाजवणारा माणुस हे चिन्ह सर्वांपर्यंत पोहोचवा, असं आवाहन जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना केलंय.
मोठी बातमी! भाजपाच्या संजय काकांच्या हाती घड्याळ, रोहित पाटलांविरुद्ध लढत ठरली
वेगवेगळ्या बजेटमधील पैसे कपात करून त्यांच्या योजनांना देण्याचं काम सरकारने केलंय. सरकार घालवण्यासाठी महाराष्ट्रातील जनता सुसज्ज आहे. लोकसभेत संविधानाचं रक्षण करण्याचा मु्द्दा, राज्यसभेत मेजॉरिटी कायम ठेवायची अशी भूमिका विरोधक घेवू शकतात, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. राज्यात तुम्हा सर्वांच्या ताकतीने वेगळा माहोल निर्माण होईल, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. जनतेच्या आर्शिवादाने शरद पवारांच्या पुण्याईने हा पक्ष जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणारा पक्ष ठरेल, असं जयंत पाटील जाहीर सभेत म्हणाले आहेत. या तालुक्यातील 100 पैकी 70 मतं आपलीच आहेत, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
अनेक लोकं शरद पवार पक्षात आली आहेत. त्यांना माहिती आहे की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होणार आहे. शेवटच्या चार दिवसांत मतांची किंमत मोजण्याची तयारी होईल, तेव्हा सगळ्यांनी काळजी घ्या, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलंय.