कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंसह ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत.
महसूल विभागाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला असल्याचं म्हणत आमदार आशुतोष काळेंनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलंय.
कोपरगाव मतदारसंघात कोल्हे कुटुंबियांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण हाणून पाडलं, असा आरोप करत मातंग समाजाने काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केलायं.
पुतळ्यासाठी मी जागा उपलब्ध करुन देणार असा शब्द आमदार आशुतोष काळे यांनी दिला होता. अखेर आमदार काळेंनी दिलेला शब्द पाळत भगवान वीर एकलव्यांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित केलीयं.
अमृत संजीवनीचे माजी संचालक विकास शिंदे यांनी आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे.
Mla Aashutosh Kale : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ट्रान्सफॉर्मर आणि वीज वाहिन्यांसाठी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे (Mla Aashutosh Kale) यांनी दिली आहे. दरम्यान, या एकूण निधीमध्ये मतदारसंघातील ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर बदलणे, वीजवाहिन्या, पोल व ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे या निधीचा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. बालरंगभूमी […]
अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण शासकीय पद्धतीनेच होणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली, त्यानंतर मातंग समाज बांधवांनी उपोषण मागे घेतलंय.
राज्य सरकारने कोपरगाव तालुक्यातील पोहेगावला ग्रामीण रुग्णालयास मान्यता दिली आहे. यासाठी आ. आशुतोष काळेंनी पाठपुरावा केला.
आमदार आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून गोदावरी नदीवरील कोल्हापुर टाईप बंधाऱे, केटीवेअर संरक्षक भिंतींच्या दुरुस्तीसाठी 19.63 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालीयं.