महसूल विभागाच्या ऐतिहासिक निर्णयांचा शेतकऱ्यांना फायदा; आमदार आशुतोष काळे

महसूल विभागाच्या ऐतिहासिक निर्णयांचा शेतकऱ्यांना फायदा; आमदार आशुतोष काळे

Mla Aashutosh Kale News : महसूल विभागाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला असल्याचं म्हणत आमदार आशुतोष काळे (Mla Aashutosh Kale) यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय. दरम्यान, कोपरगावातील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर भोगवटदार 2 अशषी नोंद असल्याने जमीनीच्या हस्तांतरणाला अडचणी येत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या नोंदीला भोगवटदार 1 असं करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीचा विचार करीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा करीत ऐतिहासिक निर्णय घेतलायं. या निर्णयाचं आमदार काळेंनी स्वागत केलंय.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर

कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते खंडकरी शेतकऱ्यांना वर्ग 1 च्या सात बारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले. बोलताना आमदार काळे म्हणाले, कोपरगाव शहरालगत असलेल्या डेअरी पोल्ट्री व वळूमाता प्रक्षेत्राची असलेली जागा व औद्योगिक वसाहतीला देण्याचा निर्णय, शेती महामंडळाची जागा एमआयडीसीला देणे तसेच शेती महामंडळाच्या कर्मचारी व त्यांच्या वारसांना, घरकुल लाभार्थ्यांना व ग्रामपंचायतीला सार्वजनिक कामासाठी देण्याचा निर्णय मतदारसंघासाठी अत्यंत फायद्याचा असल्याचं काळे यांनी स्पष्ट केलंय.

खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या उताऱ्यावर असलेली भोगवटादार 2 ही नोंद रद्द करून भोगवटादार 1 करून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खंडकरी शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. त्याबद्दल मतदार संघातील खंडकरी शेतकऱ्यांच्यावतीने त्यांचे आभार मानले. या उताऱ्यावर इतर हक्कामध्ये शेती महामंडळ किंवा बायो-रिफाइनरी अशी येत असलेली नोंद देखील या उताऱ्यावरून दिवाळीपूर्वीच काढून टाका, अशा सूचना तहसीलदार महेश सावंत यांना दिल्या आहेत.

नवी मुंबईतील NRI कॉम्प्लेक्सच्या १७ व्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाला आग विझविण्यात यश

…तर ते चेअरमनपदही देतील – काळे
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अंतिम पेमेंट 125 प्रमाणे केले आहे. कर्मचाऱ्यांनाही एकाच टप्प्यात 20 टक्के बोनस देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक अमिष दाखवतील, कारखान्याचे चेअरमपद देण्याचेही अमिष दाखवतील पण अमिषाला बळी पडू नका, अशी खोचक टीका आमदार काळे यांनी कोल्हेंवर केलीयं.

दरम्यान, यावेळी महानंदाचे माजी चेअरमन राजेश परजणे, तहसीलदार महेश सावंत, कर्मवीर शंकरराव काळे कारखाना तसेच विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी,महसूल विभागाचे अधिकारी, खंडकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube