नागरी सुविधांचे तीन तेरा वाजले; मंत्री विखेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना झापलं, दिल्या महत्वाच्या सुचना

नागरी सुविधांचे तीन तेरा वाजले; मंत्री विखेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना झापलं, दिल्या महत्वाच्या सुचना

Radhakrushna Vikhe on civic amenities in Ahilyanagar : संगमनेर शहरातील (Sangmaner) पाणी पुरवठा यंत्रणेतील त्रुटी तातडीने दुरूस्त करून नागरीकांना शुध्द पाणी उपलब्ध करून द्यावे. शहरातील (Ahilyanagar) क्रीडा संकुल सर्व नागरीकांना उपलब्ध करण्याचा लवकर निर्णय करावा, तसेच नदी सुधार प्रकल्पाचा निर्णय करण्यापुर्वी अन्य ठिकाणची माहिती घेण्यासाठी पालिकेने समिती नेमावी, अशी सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) पाटील यांनी केल्या.

नगरपालिकेच्या सभागृहात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत महायुती सरकारच्या निधीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा तसेच नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. आमदार अमोल खताळ, अतिरीक्त जिल्हाधिकरी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसिलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे, (Ahilyanagar News) यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार, भाजपाचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, अविनाश थोरात, कैलास वाकचौरे, ज्ञानेश्वर करपे, कपिल पवार, विनोद सूर्यवंशी, रामभाऊ राहाणे हे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

काय सांगता? राज अन् उद्धव गुढीपाडव्याला एकत्र, बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल

संगमनेर शहरात पाणी पुरवठा वितरणासंदर्भातील मोठ्या प्रमाणात तक्रारी नागरिकांनी उपस्थित केल्या. शहर आणि उपनगरातील इंदिरा नगर गणेश नगर मालदाड रोड भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही, याची गांभिर्याने दखल मुख्याधिकर्यांनी घ्यावी. पाणी अशुध्द असल्याने नागरीकांना दूषित पाणी पुरवठा होतो. जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित का नाही? असा सवालही मंत्री विखे पाटील यांनी पालिका प्रशासनास केलाय.

नवीन नगर रस्त्यावरील व्यापरी तसेच नागरीकांना पावसाळ्यात होणारा त्रास कमी करण्यासाठी, मे अखेरपर्यंत या भागात उपाय योजनेचे काम गांभीर्यपूर्वक करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. दशक्रिया विधी घाटाचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण करा. म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामासाठी महायुती सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या कामातील गुणवतेबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. एप्रिल अखेरपर्यत हे काम पूर्ण करण्याची ग्वाही मुख्याधिकर्यांनी बैठकीत दिली.

महायुतीत टोकाचा संघर्ष! ‘जनतेच्या मनातील आमदार..’ धंगेकरांच्या बॅनरबाजीने रासनेंना डिवचलं, कार्यकर्ते नाराज

शहारमध्ये पालिकेने उभारलेल्या क्रिडा संकुलाचा कोणताही उपयोग नागरीकांना होत नाही. ठराविक लोकांच्या कार्यक्रमासाठी क्रिडा संकुल उपलब्ध करून दिले जात नसल्याच्या तक्रारी बैठकीत करण्यात आल्या. या सर्व तक्रारीची दखल घेवून क्रिडा संकुल सर्व नागरीकांना सकाळी आणी संध्याकाळी दोन तास द्यावे, येथे सूरक्षा रक्षक आणि विजेची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यास मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं आहे. भूमीगत गटारीचे काम करताना ठराविक भागात काम झाल्याची तक्रार करण्यात आल्या याबाबत वस्तूस्थिती माहीतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीत कोणतीही घाई न करता अन्य मोठ्या शहरामंध्ये या प्रकल्पाची काय अवस्था झाली? याची पाहणी आणि अभ्यास करावा. यासाठी समिती नेमण्याची सूचनाही मंत्री विखै पाटील यांनी केली. प्यायला पाणी नसताना बोटी कसल्या फिरवता, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.

नागरीकांच्या तक्रारीबाबत नगरपालिकेने अॅप्स तयार करावे. भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून कर आकारणी केली जात असेल, तर याचा फेरविचार व्हावा असंही मंत्र्यांनी सूचित केलंय. निळवंडे धरणातून पाईपलाईनद्वारे येणारे पाणी अकोले तालुक्याला मोफत देण्याचा निर्णय कोणी, कसा केला? याची माहीती देण्याची मागणी भाजपाचे श्रीराम गणपुले यांनी केली. याचा कोणताही लेखी करार झाला नसल्याची बाब त्यांनी निदर्शानास आणून दिल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी सर्व प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube