Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये डॉक्टरांकडून वयोवृद्ध सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

  • Written By: Published:
Ahilyanagar News :  अहिल्यानगरमध्ये डॉक्टरांकडून वयोवृद्ध सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

Ahilyanagar News : नगर शहरातील एका इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करणारे शंकर भालेश्याम कोडम यांना नगर शहरातील (Ahilyanagar) एका नामांकित खासगी रुग्णालयातील अमित भराडिया (रा.फॅन्टसी टॉवर फ्लॅट, पारिजात चौक , गुलमोहर रोड) नामक व्यक्तीने बेदम मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्ह फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सोसायटीच्या नियमानुसार वॉचमन कोडम यांनी डॉ.अमित भराडीया यांना त्यांची गाडी या ठिकाणी लावू नका असे म्हटल. मात्र कोडम यांनी आपल्याला असे म्हंटलेच कसे याचा राग मनात धरून भराडीया यांनी कोडम यांना बेदम मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याच्या साह्याने देखील खाली पाडून जोरदार मारहाण केल्याचे व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसते आहे.

समोरील व्यक्तीच्या वयाचा विचार न करता भरडिया यांच्याकडून त्या सुरक्षा रक्षकाला लाथा बुक्याने मारहाण करण्यात आली असल्याची माहिती समजते आहे. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सिक्युरिटी एजन्सीचे मालक मनसुख वाबळे हे आरोपी भराडीया यांना याबाबत विचारावयास गेले असता त्यांना देखील शिवीगाळ करण्यात आली.

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’, सेन्सेक्स 1414 अंकांनी घसरला

दरम्यान या प्रकरणी शंकर भालेश्याम कोडम यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ/दत्तात्रय शिरसाट करीत आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध शुभमन गिलकडे टीम इंडियाची कमान, रोहित शर्मा खेळणार नाही? ‘हे’ आहे कारण 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube