Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’, सेन्सेक्स 1414 अंकांनी घसरला

  • Written By: Published:
Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’, सेन्सेक्स 1414 अंकांनी घसरला

Stock Market Crash :  भारतीय शेअर बाजारात (Stock Market Crash) आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या घसरणीमुळे 1996 नंतर पुन्हा एकदा मंदी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स (Sensex) 1414.33 अंकांनी घसरून 73,198.10 वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) 420.35 अंकांनी घसरून 22,124.70 वर बंद झाला. आज सेन्सेक्समधील 30 पैकी 29 शेअर्स घसरले तर निफ्टीमधील 50 पैकी 45 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर रुपया 30 पैशांनी कमकुवत होऊन 87.50 पोहोचला आहे.

तर दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, टायटन यांच्या शेअर्समध्ये आज 4 टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली तर सेन्सेक्समध्ये फक्त एचडीएफसी बँकेचे शेअर्स 1.79 टक्क्यांनी वाढून बंद झाले. निफ्टीच्या आकडेवारीनुसार आज 2972 स्टॉकचे व्यवहार झाले. ज्यामध्ये फक्त 489 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर 2416 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

शेअर बाजार का कोसळला?

गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होताना दिसत आहे. या घसरणीमुळे आतापर्यंत गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडाले आहे. अमेरीकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडामधून होणाऱ्या आयातीवर नवीन शुल्क लादण्याची घोषणा केली आहे, याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारात झाला आहे. याचबरोबर एफआयआय भारतीय बाजारात सतत विक्री करत असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीवरही परिणाम होत आहे.

न्यूझीलंडविरुद्ध शुभमन गिलकडे टीम इंडियाची कमान, रोहित शर्मा खेळणार नाही? ‘हे’ आहे कारण

तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल काही महत्त्वाचे डेटा सरकार जाहीर करणार आहे. त्यामुळे देखील भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळात आहे. आता शेअर बाजारातील गोंधळामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होते तसेच रुपया कमकुवत झाल्यामुळे सामान्य माणसाचेही नुकसान होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube