न्यूझीलंडविरुद्ध शुभमन गिलकडे टीम इंडियाची कमान, रोहित शर्मा खेळणार नाही? ‘हे’ आहे कारण

  • Written By: Published:
न्यूझीलंडविरुद्ध शुभमन गिलकडे टीम इंडियाची कमान, रोहित शर्मा खेळणार नाही? ‘हे’ आहे कारण

IND vs NZ: पाकिस्तानचा पराभव करत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने (Team India) आपले स्थान निश्चित केले आहे. तर आता 2 मार्च रोजी भारतीय संघ या स्पर्धेत आपला शेवटाचा ग्रुप सामना न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) खेळणार आहे. मात्र या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळताना दिसणार नसल्याची माहितीसमोर आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची कमान स्टार फलंदाज शुभमन गिलकडे असणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलेली नाही.

रोहित शर्माला मिळणार विश्रांती?

पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. याबाबत इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून विश्रांती देण्यात येऊ शकते. भारतीय संघाने बुधवारी सराव केला मात्र या सराव सत्रात रोहित शर्माने भाग घेतला नाही. सराव सत्रा दरम्यान तो मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरशी (Gautam Gambhir) बोलताना दिसला.

गिलकडे भारतीय संघाची कमान?

बीसीसीआयने (BCCI) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभमन गिलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जर रोहित शर्माला पुढील सामन्यात विश्नांती दिली तर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान देण्यात येऊ शकते. जर असं झालं तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून गिलचा हा पहिलाच सामना असू शकतो. यापूर्वी शुभमन गिलने टी-20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. तर दुसरीकडे रोहितच्या जागी ऋषभ पंत किंवा वॉशिंग्टन सुंदर पैकी एकाला अंतिम अकरामध्ये संधी मिळु शकते. सराव सत्रात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील सराव करताना दिसला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube