बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर
Border-Gavaskar Trophy 2024 : नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी (Border-Gavaskar Trophy 2024) खेळणार आहे. मात्र या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी यजमान संघ ऑस्ट्रेलियाला (Australia) मोठा धक्का बसला आहे. माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू कॅमेरून ग्रीनने (Cameron Green) त्याच्या पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चरची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो भारताविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर रहाणार आहे.
याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माहिती दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार ग्रीनला पुन्हा एकदा फिट होण्यासाठी किमान सहा महिने लागणार आहे त्यामुळे तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. या शस्त्रक्रियेमुळे ग्रीन केवळ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधूनच नाहीतर जानेवारीमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यातूनही बाहेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
🚨 HUGE SET-BACK FOR AUSTRALIA 🚨
Cameron Green ruled out of the Test series against India…!!!! pic.twitter.com/ugE98hBxwa
— Johns. (@CricCrazyJohns) October 14, 2024
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने पाठीवरची दुखापत वाढल्याने त्याने यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. या शस्त्रक्रियेमुळे त्याला भारत विरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळता येणार नाही आणि त्याला यामधून सावरण्यासाठी सहा महिने लागणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधून ग्रीन बाहेर झाल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. कारण तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसोबतच तो गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो.
ग्रीन संघात नसल्यामुळे, स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा त्याच्या नियमित स्थान नंबर 4 वर खेळताना दिसू शकतो. अशा परिस्थितीत उस्मान ख्वाजाचा सलामीचा जोडीदार म्हणून ऑस्ट्रेलिया मॅथ्यू रेनशॉ, मार्कस हॅरिस किंवा कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांची निवड होण्याची शक्यता आहे.
विषय हार्ड! ‘या’ कंपनीने दिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना दिली चक्क Mercedes-Benz कार
तर दुसरीकडे जर ऑस्ट्रेलियाला ग्रीनच्या जागी अष्टपैलू खेळाडू आणायचा असेल तर संघात आरोन हार्डी किंवा ब्यू वेबस्टर यांची देखील निवड होण्याची शक्यता आहे. गेल्या 4 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताने जिंकले आहे त्यामुळे या ऑस्ट्रेलिया या मालिकेसाठी कोणताही धोका पत्करणार नसल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आली आहे.