नवी मुंबईतील NRI कॉम्प्लेक्सच्या १७ व्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाला आग विझविण्यात यश

  • Written By: Published:
नवी मुंबईतील NRI कॉम्प्लेक्सच्या १७ व्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाला आग विझविण्यात यश

Building fire in Navi Mumbai : नवी मुंबईतील नेरुळ येथील एनआरआय (Mumbai) कॉम्प्लेक्सच्या बिल्डिंग क्रमांक ४७ मध्ये आज लागल्याची घटना घडली. कॉम्प्लेक्सच्या १७ व्या मजल्यावर आग लागली असल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न मोठे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि अत्याधुनिक ब्रॉंटो लिफ्ट घटनास्थळी दाखल झाल्याने जलदगतीने आग विझविण्यास मदत झाली.

मोठी बातमी! एअर इंडियाच्या मुंबई-न्यूयॉर्क विमानाला बॉम्बस्फोटाची धमकी, विमान दिल्लीकडे वळवलं

आगीमध्ये सापडलेले घर पूर्णपणे जळून खाक झालं असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ज्या घरात आग लागली होती तिथल्या व्यक्तींनी आग लागल्याचं कळताच तात्काळ तिथून बाहेर पडत अग्निशमन दलाला सूचना दिल्याने मोठी दुर्घटना होण्यापासून टळल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितलं जात आहे. मात्र, आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

या घटनेनंतर लोकांनी इमारत रिकामी केली. आगीमागची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. आग विझल्यानंतरच तपासात आगीचे कारण समोर येईल. अग्निशमन दलाचे अधिकारी परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत लोकांना इमारतीपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube