मोठी बातमी! एअर इंडियाच्या मुंबई-न्यूयॉर्क विमानाला बॉम्बस्फोटाची धमकी, विमान दिल्लीकडे वळवलं

  • Written By: Published:
मोठी बातमी! एअर इंडियाच्या मुंबई-न्यूयॉर्क विमानाला बॉम्बस्फोटाची धमकी, विमान दिल्लीकडे वळवलं

Air India Mumbai-New York flight Bomb Threat : मोठी बातमी समोर येत आहे. एअर इंडियाच्याच विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या बॉम्बच्या धमकीनंतर एअर इंडियाचे मुंबई-न्यूयॉर्क विमान दिल्लीकडे वळवण्यात आलं आहे. या धमकीनंतर तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीच्या IGI विमानतळावर उतरवण्यात आलं आहे.  प्रवासी आणि क्रू मेंबर्सची सुरक्षा लक्षात घेऊन सुरक्षा प्रोटोकॉलनुसार विमानाची तपासणी केली जात आहे.

मोठी बातमी! आचारसंहितेपूर्वी सरकारची मोठी घोषणा; मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी

एअर इंडियाच्या दुसऱ्या एका विमानात 22 ऑगस्ट रोजी बॉम्बची धमकी मिळाल्यानंतरही असंच प्रकरण घडलं होतं. हे विमान मुंबईहून तिरुअनंतपुरमला पोहोचलं होतं. यानंतर विमानतळावर संपूर्ण बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विमानात 135 प्रवासी होते

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी गृहमंत्री; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरून राऊतांचा फडणवीसांवर वार

या प्रकरणी एअर इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की 14 ऑक्टोबर रोजी मुंबईहून जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करणाऱ्या एआय 119 या विमानाला विशेष सुरक्षा अलर्ट मिळाला होता. सरकारच्या सुरक्षा नियामक समितीच्या सूचनेनुसार ते दिल्लीच्या दिशेने वळवण्यात आलं. सर्व प्रवासी सुरक्षित उतरले आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या