मोठी बातमी! आचारसंहितेपूर्वी सरकारची मोठी घोषणा; मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी
CM Shinde Announcement Toll Waiver : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आज-उद्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मंत्रालयात हालचालींना मोठा वेग आल्याचं दिसतय. आज महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून हा निर्णय लागू होणार आहे.
मोठी बातमी! मंत्रालयात आज शेवटची कॅबिनेट बैठक होणार; उद्या आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता
आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या संदर्भात मोठी गोपनीयता ठेवण्यात आली आहे. मंत्रीमंडळ बैठकीचा अजेंडा मंत्र्यांना थेट बैठकीत दिला जाणार आहे. बैठकीच्या आधी कोणत्याही मंत्र्यांना किंवा अधिकाऱ्यांना अजेंडा दिला गेला नाही . त्यामुळे आयत्यावेळी अनेक निर्णय होणार आहे.
अनेक निर्णय घेतले
समाजातील वेगवेगळ्या घटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळपास दुप्पटे केलं आहे. या निर्णयाचा जवळपास 50 हजार होमगार्ड्सना फायदा होणार आहे. यासह सरकारने राज्यातील अनेक आयटीआय संस्थांची नावं बदलली आहेत. या संस्थांना महापुरुषांची नावं देण्यात आली आहेत. राज्य सरकारने राज्यातील मदरशांत शिकविणाऱ्या शिकक्षांचे मानधनही दुप्पट केलं आहे.
राज ठाकरेंची प्रतिक्रिया
गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता, त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा, नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल अशी प्रतिक्रिया मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली आहे.
कोणत्या पाच टोलनाक्यावर टोलमाफी?
आनंदनगर टोलनाका
दहिसर टोलनाका
मॉडेला टोलनाका
वाशी टोलनाका
ऐरोली टोलनाका