मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक, मनोज जरांगेंना चर्चेसाठी निमंत्रण

मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक, मनोज जरांगेंना चर्चेसाठी निमंत्रण

Maratha Reservation : जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक तालुक्यत आणि शहरात बंद पाळला जात आहे. काही शहरात या हिंसाचार देखील झाल्याचे दिसून आले. यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीची ही बैठक दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही वेळात जालन्यात पोहचणार आहेत. ते या दौऱ्यात जखमी झालेल्या लोकांची भेट घेणार आहेत तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर
जालना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सीएम शिंदे म्हणाले की, अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था (एडीजीपी) संजय सक्सेना लाठीचार्जच्या घटनेची चौकशी करतील आणि गरज पडल्यास संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल.

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्या, ओबीसी नेत्यांनेच मांडली भूमिका

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे यांच्याशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना चर्चेसाठी आमंत्रित केल्याचे त्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल. मनोज जरंगे यांना ताब्यात घेतल्यानंतर हिंसाचार उसळल्याचे सांगण्यात येत आहे, त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणताही प्रश्न चर्चेने सोडवला जातो. या प्रकरणावरून राजकारणही सुरू आहे. ज्या आंदोलकांवर चुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांचे गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

IND Vs NEP: पावसामुळे भारत-नेपाळ सामना रद्द झाला तर काय होईल?

जालन्यात विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जालन्यात गर्दी जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. आजपासून 17 सप्टेंबरपर्यंत कलम 37 (3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. जालन्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. उपद्रव पसरविणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जात आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube