Video : एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट; प्रकृती खालावल्याने रूग्णालयात भरती

  • Written By: Published:
Video : एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट; प्रकृती खालावल्याने रूग्णालयात भरती

मुंबई : नव्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा एक दिवसावर येऊन ठेपलेला असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पुढील उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या चार दिवसांपासून शिंदेंना ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. यामुळे त्यांच्या नियोजित भेटीगाठीदेखील रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरीच उपचार केले जात होते. मात्र, त्यानंतरही शिंदे यांना बरं वाटत नसल्याने आता त्यांना पुढील उपचारांसाठी ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. (Caretaker Maharashtra CM Eknath Shinde Health Update)

दरम्यान, शिंदे यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर ज्युपिटर रूग्णालयातील डॉक्टरांची एक टीम शिंदेंच्या तब्येतीची तपासणी करणार आहेत. यात त्यांना नेमका काय आजार झाला आहे हे समाणार असून, त्यानंतर शिंदेंना उपचारांसाठी रूग्णालयात दखल करून घ्यायचे की याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदे यांचा ताप काही केल्या कमी होत नसल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी निगेटिव्ह

एकनाथ शिंदे यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहेत. त्यातच अंगात तापही आहे. अशक्तपणा आल्यामुळे एकनाथ शिंदे यांना सलायन लावण्यात आले. डेंग्यू आणि मलेरियाची लक्षणे जाणवत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांची चाचणी करण्यात आली. एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

”तिकीट फायनल झालं, गावाकडं आलो अन् ठाकरेंनी शब्द फिरवला”; रविकांत तुपकरांचा मोठा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे प्रकृती बिघडली

राज्यात महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री ठरू शकलेला नाही. तसंच, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. एकीकडे राज्यातील सरकार स्थापनेवरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असतानाच, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या धावपळीमुळे आराम करण्यासाठी शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी गेले होते. तिथे त्यांची प्रकृती बिघडली.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दररोज ८ ते १० सभा करत असल्याने प्रचंड धावपळ झाली होती. यातून थोडासा आराम करण्यासाठी दरे मुक्कामी आलो असून, आपली तब्येत बरी नसल्याचे शिंदे यांनी सांगितलं होतं. दरे गावात विश्रांती घेतल्यानंतर रविवारी ते ठाण्यातील निवासस्थानी परतले. सोमवारी ते पुन्हा पक्ष आणि महायुतीच्या बैठकांमध्ये सक्रिय होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, सोमवारीही त्यांची प्रकृती ठीक नव्हती. यामुळे त्यांनी दिवसभरातील बैठका रद्द करून घरीच विश्रांती घेतली होती. याठिकाणी त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचारदेखील करण्यात आले. मात्र, त्यानंतरही शिंदेंचा ताप कमी होत नसल्याने आणि अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल केले जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube