बाबा सिद्दीकींच्या डायरीत भाजप नेत्यासह ‘या’ बिल्डरांची नावं; कंबोज यांचाही खुलासा
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी यांच्या (Baba Siddique) हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या जबाबात त्यात मोठा दावा करण्यात आलाय. हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांचं नाव लिहीलं होतं. बाबा सिद्दीकी यांना रोज डायरी लिखाणाची सवय होती. सिद्दीकींच्या डायरीतलं अखेरचं नाव मोहित कंबोज यांचं असल्याचे झिशान सिद्दीकी यांनी सांगितलं. मोहित कंबोज यांचं नाव घेऊन त्यांनी संशय व्यक्त केलाय.
जबाबात बिल्डर पृथ्वी चव्हाण, शाहीद बलवा यांचा सुद्धा उल्लेख आहे. विनोद गोएंका, ओंकार बिल्डर्स यांच्या नावांचाही जिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या जबाबात उल्लेख आहे. जिशान यांच्या जबाबानुसार वांद्रे येथील पुनर्विकास प्रकरणाचा संबंध आहे. या प्रकरणात नागरिकांची बाजू घेतली त्यामुळे त्यांची हत्या झाली असा दावा झिशान यांनी केला. परंतु, हत्येचा पुनर्विकास प्रकरणाशी काही संबंध नाही असा दावा पोलिसांनी केला आहे. बिश्नोई टोळीच्या अँगलवर पोलीस अजूनही ठाम आहेत.
जे आरोपी या हत्येत सहभागी होते त्यांचे पर्सनल स्टेटमेंट देखील या आरोपपत्रात आहेत. ते लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी काम करत होते. अनमोल बिश्नोई त्यांना हँडल करत होता. पण झिशान सिद्दीकी यांनी त्यांच्या जबाबात कुठेही लॉरेन्स बिश्नोई टोळीचा उल्लेख केलेला नाही. ते आणि त्यांचे वडील पुनर्वसनाच्या कामात नेहमीच जनतेसाठी उभे राहायचे. त्यामुळे काही बिल्डर्सशी त्यांचे संबंध चांगले नव्हते असा उल्लेख झिशान यांनी त्यांच्या जबाबात केलाय.
मोठी बातमी! शूटरने उघड केलं खळबळजनक रहस्य; अनमोल बिश्नोईने बाबा सिद्दिकींची हत्या का केली?
यात त्यांनी दहा मोठ्या बिल्डर्सशी नावे दिली आहेत. यात भाजप नेते मोहित कंबोज यांच्याही नावाचा उल्लेख आहे. वडिलांना डायरी लिहीण्याची सवय होती. ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी त्यांनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहीलं होतं असे झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. व्हॉट्सअपवर बोलणंही झालं होतं पण त्याचा कॉन्टेक्स नेमका काय होता याचा उल्लेख मात्र त्यांनी केला नव्हता. कुणाचं डायरीत नाव लिहीलं म्हणजे ते का लिहीलं याचा कॉन्टेक्सही येतो. पण जबाबात कॉन्टेक्स लिहीलेला नाही. मात्र त्यांचं नाव लिहीलेलं आहे असं जबाबात सांगितलं आहे. जबाबाच्या शेवटी मी जे काही सांगितलं आहे त्यावर तपास होणे गरजेचे आहे.
पोलीस लॉरेन्स बिश्नोई अँगलवर ठाम..
नंतर या अँगलनेही पोलिसांनी तपास केला मात्र पोलिसांना कोणतीही संशयास्पद लिंक सापडलेली नाही. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचाच हात आहे यावर पोलीस यंत्रणा ठाम आहे. या अँगलनुसारच पुढील तपास होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
उद्धव ठाकरेंची कोंडी! मनपा निवडणुकीआधीच मोठ्या नेत्याचा जय महाराष्ट्र; शिंदे गटात प्रवेश
सत्य बाहेर येईल, योग्य न्याय होईल : कंबोज
यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी निवेदन जारी करत आपली बाजू मांडली आहे. झिशान सिद्दीकी यांचे वक्तव्य तोडून वापरले जात आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्या दिवशी माझे त्यांच्याशी बोलणे झाले होते असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे. बाबा सिद्दीकी माझे चांगले मित्र होते. आम्ही दोघे एकमेकांशी बोलायचो. यात निवडणुकीचाही विषय असायचा. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्यावेळी मलाही धक्का बसला. मी त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी रुग्णालयातही गेलो होतो. आता या प्रकरणातील सत्य काय ते बाहेर येईल. योग्य तो न्याय होईल असे मोहित कंबोज यांनी या निवेदनात म्हटले आहे.
ठाकरे गटाचे परब अन् दहा बिल्डर्स..
झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना जो जबाब दिला आहे त्यात ठाकरे गटाचे नेते अनिल परब, भाजप नेते मोहित कंबोज यांच्यासह अन्य बिल्डर्सच्या नावांचा समावेश आहे. परब एसआरए प्रकरणात स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते. हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकी आणि मोहित कंबोज यांच्यात अर्धा तास संभाषण झालं. साडेपाच ते सहा अर्धा तास दोघांचं व्हॉट्सअपवर संभाषण झाल्याचा दावा झिशान सिद्दीकी यांनी केला. हत्येच्या आधी एका बिल्डरने फोन करून बाबा सिद्दीकींना धमकी दिली होती. झिशान सिद्दीकी यांनी जबाबात मुंद्रा बिल्डर्स, पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, अदानी, विनोद गोयंका, नबीद पटेल, ओंकार बिल्डर्स, विनोद ठक्कर, शिवालिक व्हेंचर्स आणि परवेज लाकडावाला या बिल्डर्सची नावं झिशान सिद्दीकी यांच्या जबाबात आहेत.