संजय राऊतांना धमकी देणाऱ्याचं लॉरेन्स बिष्णोई कनेक्शन? पोलिसांनी सांगितलं…
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मेसेजद्वारे आलेल्या धमकीबाबत पोलिसांकडून नवी अपडेट समोर आली आहे. या धमकी प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई कनेक्शन नसल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.
Maharashtra Corona Update : कोरोनाचं सावट अधिक गडद; 24 तासांत 900 रूग्णांची भर, तिघांचा मृत्यू
संजय राऊतांना धमकी देणार राहुल तळेकर पुण्यात एक हॉटेल चालवत असून तो मूळचा जालना जिल्ह्याचा रहिवासी आहे. संजय राऊत यांची बातमी पाहुन त्याने इंटरनेटवरुन संजय राऊतांचा फोन नंबर मिळवला होता.
त्यानंतर त्याने संजय राऊतांना अनेकदा फोनही केला, मात्र फोन न उचलल्याने राहुल तळेकरने संजय राऊत यांनी मेसेजद्वारे धमकी दिल्याची कबुली दिल्याची माहिती कराड यांनी दिली आहे.
राज्यातील सरकार बिनडोक्याचं, हे फक्त स्वतःसाठी जगतात नाना पटोलेंची सरकारवर टीका
हा सर्व प्रकार राहुल तळेकर याने दारुच्या नशेत केला आहे. धमकीच्या मेसेजमध्ये लॉरेन्स बिष्णोई याच्या नावाचा उल्लेख असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. तपासाअंती राहुल तळेकर हा शिवसेनेला माननारा असल्याचं उघड झालं होतं.
मात्र, राहुल तळेकर याने दिलेल्या धमकीचा आणि लॉरेन्स बिष्णोईचा काहीही संबंध नसल्याचं पोलिस उपायुक्त कराड यांनी सांगितलं आहे.
राजकीय टीकेनंतर ‘वर्षा’ अन् ‘सागर’ बंगल्यावरील खर्चावर मर्यादा…
राहुल तळेकरला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं होतं. न्यायालयासमोर त्याला हजर केलं असता न्यायालयाकडून त्याला पोलिस कस्टडी देण्यात आली होती. मात्र, आज त्याचा जामीन मंजूर झाला असून त्याला सोडण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय.
दरम्यान, राऊतांना आलेल्या धमकीनंतर एकीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी सुरक्षा दिली जातेय आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली जात असल्याचा आरोप सुनिल राऊत यांनी केला होता.