Maharashtra Corona Update : कोरोनाचं सावट अधिक गडद; 24 तासांत 900 रूग्णांची भर, तिघांचा मृत्यू

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 07T185603.550

Maharashtra Corona Update :  महाराष्ट्रात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला असून, गेल्या चोवीस तासात राज्यात 926 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात सक्रिय प्रकरणांची संख्या आता 4487 वर पोहोचली आहे.

राज्यामध्ये आज ४२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७९,९५,६५५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ९८.१२% एवढे झाले आहे. तसेच आज राज्यात ९२६ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.  राज्यात आज ३ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे असून सध्या राज्यातील मृत्यू १.८२% एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ४४८७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Letsupp Special : एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर असणार भाजपच्या विशेष टीमची नजर!

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६६, ८७, ६५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,४८,५९९ (०९.४० टक्के) कोरोना चाचणीचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या कोविड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सूचनेनुसार २४ डिसेंबर २०२२ पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.

संजय राऊतांना धमकी देणाऱ्याचं लॉरेन्स बिष्णोई कनेक्शन? पोलिसांनी सांगितलं…

या मध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून २ टक्के प्रवाशांचे नमुने कोविडसाठी घेण्यात येत आहेत. आता पर्यन्त आढळलेल्या साठ रुग्णांपैकी बारा रुग्ण मुंबई, बारा रुग्ण पुणे, नवी मुंबई, अमरावती, सांगली, औरंगाबाद, सातारा, नागपूर प्रत्येकी एक रुग्ण आणि सहा रुग्ण गुजरात, पाच रुग्ण उत्तर प्रदेश, तीन रुग्ण केरळ तर तामिळनाडू, राजस्थान, ओडीसा, वेस्ट बंगाल प्रत्येकी दोन, आणि गोवा, आसाम, बिहार, तेलंगाना, हैदराबाद, चेन्नई, पंजाब, नवी दिल्ली येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

Tags

follow us