राज्यातील सरकार बिनडोक्याचं, हे फक्त स्वतःसाठी जगतात नाना पटोलेंची सरकारवर टीका

  • Written By: Published:
राज्यातील सरकार बिनडोक्याचं, हे फक्त स्वतःसाठी जगतात नाना पटोलेंची सरकारवर टीका

Nana Patole Attack On Maharashtra Government : मुख्यमंत्र्याच्या चहापानाबाबत बोलताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) सरकारवर टीका करत म्हंटले कि राज्यातील सरकार बिनडोक्याने काम करीत आहे, सरकार स्वतःसाठी जगत आहे, शेतकऱ्यांना द्यायला पैसे नसताना 1 हजार कोटींची जाहिराती दिल्या आहेत, जनतेचे काही देने घेणे नाही, गॅस च्या किमती कमी केल्या नाही, स्वतःसाठी जगणारी भाजप ची सरकार आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

काँग्रेसच्या (INC) सभाबाबत बोलताना त्यांनी सांगितले काँग्रेसच्या सभांची सुरवात नागपुरातून होणार आहे, 6 सभा होणार आहेत. राहुल,(Rahu) प्रियांका(Priyanka) गांधी आणि खरगे (Kharge) यांच्या प्रामुख्याने सभा होतील, याबाबत 10 तारखेला ठाण्यात मिटिंग घेण्यात येणार आहे. पहिली सभा या महिन्याच्या शेवटला होण्याची शक्यता आहे. नंतर कर्नाटक निवडणुकीनंतर सभा होतील. परंतु या सभा फक्त काँग्रेस पक्षाच्या असतील या महाविकास आघाडीच्या नसतील. परंतु या सभेसाठी महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण दिल जाईल. तसेच 16 तारखेला नागपूरला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेसाठी आज बैठक घेत आहे. भाजपला ही सभा होऊ नये असं वाटते पण आम्ही ही सभा घेणारच आहोत.

Apurva Nemlekar: अपूर्वाचा अनोखा अंदाज, ‘रावरंभा’ चित्रपटात ‘शाहीन आपा’च्या भूमिकेत 

पुढे नाना पटोलें मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलतांना म्हटले प्रभू श्रीराम (Shriram) आपले दैवत आहे. मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे, आम्ही देखील रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी केली, अयोध्येला जाण्यात काही गैर नाही. म्हाला शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मान्य आहे, सर्वसमावेशक हिंदुत्व आम्हाला मान्य आहे.

पुण्यातील खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीबाबत बोलताना नाना म्हणाले अजून कुठल्याही पक्षकडुन उमेदवार जाहीर नाही, अखेर भाजप (BJP) पुण्यात निवडणूक लावेल की नाही याबाबतच शंका आहे.

Eknath Shinde मी सर्वांना कामाला लावले : …म्हणूनच घरात बसणारे आता रस्त्यावर उतलेत!

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या विधानाबाबत बोलताना नाना म्हणाले आम्हाला शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मान्य आहे आणि त्याबरोबर काँग्रेस पक्ष आहे. हिंदुत्व हे कल्चर आहे संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये सगळ्यांना सामावून घेण्याची भूमिका छत्रपतींची होती.

आता द्वेषा द्वेषा ची लोक अशा प्रकारची भूमिका घेत असेल तर आम्हाला कुठलेही सोयर सुतक नाही आमचे हिंदुत्व शिवाजी महाराजांच आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube