सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला राजस्थानमधून अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला राजस्थानमधून अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Salman Khan Firing case: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्य (Salman Khan’s) गॅलेक्सी अपार्टंमेंटवर 14 एप्रिल रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एका आरोपीला अटक केली. या आरोपीचे नाव बनवारीलाल गुजर (Banwarilal Gujar) (वय 25) असं असून त्याला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे.

महायुतीत जागा वाटपावरून पुन्हा रस्सीखेच? राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘इतक्या’ जागांवर उमेदवार देण्याची तयारी 

सलमानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर त्याला बिष्णोई टोळीशी संबंधित एका व्यक्तीने यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने सलमानला बिश्नोई गॅंगच्या नावाने धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांना आपली चक्रे फिरवत तपासाला गती देत आज एकाला अटक केली. अटक केलेल्या आरोपीविरुध्द भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 506(2), 504, 34 आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 66(d) अंतर्गत दक्षिण सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या व्यक्तीचं नाव बनवारीलाल गुजर असं असून त्याला आज संध्याकाळपर्यंत मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Rahul Gandhi: ‘ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स; राहुल गांधींचं ट्वीट, वायकरांच्या बातमीचं जोडलं कात्रण 

कधी आणि कोणी दिली धमकी?
14 एप्रिल रोजी सकाळी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार केला. या घटनेनंतर प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार ते पाच आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती.

या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी सलमान आणि त्याचा भाऊ अरबाज खान यांचे जबाब नोंदवले होते. गुन्हे शाखेच्या चार सदस्यीय पथकाने 4 जून रोजी सलमान राहत असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटला भेट देऊन त्यांचे जबाब नोंदवले होत. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सलमान आणि अरबाजला सुमारे 150 प्रश्न विचारले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर आता बनवारीलाल गुजर ला पोलिसांनी अटक केली. गुजर हा बुंदी जिल्ह्यातील रहिवाशी आहे. त्याने सलमानला यूट्यूबवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज