Download App

Mahesh Kale: ‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे करणार संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण

Shyamchi Aai: ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) या मराठी सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या मराठी सिनेमाच्या (Marathi Movie) धमाकेदार टीझरला आणि ट्रेलरला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली. (Shyamchi Aai Marathi Movie) सिनेमाचा लूक ते कथा, संवाद, सादरीकरण याबाबतीत अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी समोर येत असतानाच सध्या चर्चा सुरु झाली आहे, ती ‘श्यामची आई’ या मराठी सिनेमातील गाण्यांची. शास्त्रीय संगीताचे उपासक राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे (Mahesh Kale) यांनी साने गुरुजींनी लिहिलेली ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..’ ही प्रार्थना नव्या सुरामध्ये आणि चालीत गुंफुन आपल्यासमोर गाण्याच्या स्वरूपात आणल्याचे बघायला मिळाले आहे.

या गाण्यासंदर्भात बोलत असताना महेश काळे म्हणाले की, “माझं काम पाहिलं तर जगाला आनंद वाटण्याचं काम आहे. काही वेळेला गाणं गाऊन, काही वेळी त्याच्याबद्दल मत प्रदर्शन करून तर केंव्हा केंव्हा नुसतं ऐकून तर कधी संगीतबद्ध करून गाण्याची वेगवेगळी आयामं मी माझ्या कामातून समोर आणत असतो. या गाण्यासंदर्भात मला आकाश पेंढारकर यांचा फोन आला. मला ते म्हणाले,’तू गाणं गाशील का?’, मी त्या गाण्याचे शब्द पाहिले आणि पहिल्या दोन ओळी ऐकून माझा गाणं गाण्याचा निर्णय पक्का झाला. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे .’. कायम गायक म्हणून आपण तन्मयतेने तल्लीनतेने प्रेम वाटत असतो. पण त्याला जर सामाजिकभावनेची झालर मिळाली तर या सगळ्या कार्याला एक वेगळं स्थान प्राप्त होतं.किंबहुना मला असं वाटतं ज्या समाजाने मला प्रेम दिलंय त्या समाजाचं मी देणं लागतो. याचा विचार करताना या प्रार्थनेला चाल लावण्याचे भाग्य मिळणं ह्यातून समाजाची परतफेड करण्याची संधी मला मिळाली”.”हे गाणं नसूम प्रार्थना आहे, नव्हे एक संवेदना आहे.. हे गाणं प्रत्येकाच्या मनात बसलं पाहिजे. गाण्याचे शब्द कायम लक्षात राहतील यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केलेयत”.

या मराठी सिनेमाच्या निर्मात्यांनी महेश काळे ह्यांनी संगितबद्ध केलेली आणि गायलेली ‘खरा तो एकाची धर्म’ ही प्रार्थना जगभरातील सर्व शाळांसाठी खुल्ली ठेवण्याचा मोठा निर्णय हाती घेतला आहे. ‘श्यामची आई’ या मराठी सिनेमाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे तर सुपरहिट ‘पावनखिंड’ सिनेमाचे निर्माते भाऊसाहेब, अजय, अनिरुद्ध आरेकर, आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत.

सामाजिक अस्थिरतेचा नाट्य संमेलनाला फटका; मुहूर्तमेढीचा कार्यक्रम रद्द, स्वागताध्यक्षांचा राजीनामा

अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत ‘श्यामची आई’ या मराठी सिनेमाची घोषणा झाल्यापासून जोरदार चर्चा होत आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ या मराठी सिनेमाची संहिता सुप्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे. ‘श्यामची आई’ या मराठी सिनेमात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर ही स्टारकास्ट मनोरंजन करताना बघायला मिळणार आहे.

Tags

follow us