Sonam Kapoor : सोनम कपूर गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. तिच्या प्रेग्नंसीनंतर आता पुन्हा ही ती चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. त्यानिमित्त तिने बोलताना सांगितले की, ती कामासाठी तिच्या वडिलांकडून म्हणजे अभिनेते अनिल कपूर यांच्याकडून प्रेरणा मिळते. कारण ते आजही त्याच उर्जेने काम करतात. जेव्हा की त्यांनी गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटांमध्ये काम केले आहे.
महाशक्ती सोबत असूनही ‘डरपोक’ सिनेट निवडणुकीला घाबरले; आदित्य ठाकरेंची बोचरी टीका
पुढे सोनम म्हणाली, मला माझ्या वडिलांकडून खूप काही शिकायला मिळते. ते माझं प्रेरणास्थान आहे. त्यांनी जवळपास 5 दशक काम केलं आहे. आजही करत आहेत. ते प्रत्येक दिवशी तेव्हढेच उत्साही असतात. जेवढे ते कोणत्याही प्रोजेक्टच्या पहिल्या दिवशी असतात. त्यामुळे मी प्रार्थाना करते की, मी देखील तशीच असावी. कारण मला जर कायम असंच कार्यरत असायचं असेल तर मला त्यांच्या सारखं असावं लागेल.
जीवे मारण्याचा प्रयत्न करत प्रवाशाला लुटणारा आरोपी जेरबंद, कोतवाली पोलिसांची कामगिरी
माझे वडील अनिल कपूर यांनी एक बेन्चमार्क सेट केला आहे. तो रेकॉर्ड त्यांच्या मुलांना आणि इतर नविन कलाकारांना मोडने खूप कठीण आहे. तसेच त्यांची कामावरची निष्ठा, फिटनेस, तसेच त्यांची लोकांचं खूप काळ मनोरंजन करण्याची इच्छा. मला देखील त्यांच्या सारखंच काम करायचं आहे. ते म्हणतात अभिनेता हा कायम अभिनेता असतो. तर सेट ही माझी आवडती जागा आहे. तसेच कॅमेरा फेस करण्यात मला निखळ आनंद मिळतो.
दरम्यान सोनम कपूर लवकरच दोन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. ते पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येतील. ती म्हणते या प्रोजेक्ट्ससाठी उत्सुक आहे. तर आता प्रेग्नंसीनंतर तिला तिचं काम आणि कुटुंब हे दोन्ही समतोलरित्या करायचं आहे. तर मला याचा आत्मविश्वास आहे की, मी हे उत्तम करू शकेन कारण माल याची प्रेरणा माझ्या वाडिलांकडून मिळते. ते हे गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत.