महाशक्ती सोबत असूनही ‘डरपोक’ सिनेट निवडणुकीला घाबरले; आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

महाशक्ती सोबत असूनही ‘डरपोक’ सिनेट निवडणुकीला घाबरले; आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

Aditya Thackeray On Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) सिनेट निवडणुकीला (Senate Election) रातोरात स्थगिती दिल्यानं राजकीय पक्षांसोबतच विद्यार्थी संघटनाही संतप्त झाल्या आहेत. या निवडणुकीला स्थगिती देतांना विद्यापीठ प्रशासनाने कोणतेही ठोस कारण दिले नाही. दरम्यान, या निवडणुक स्थगितीवरून आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. स्थानिक आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणेच मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला देखील घाबरले, अशी टीका त्यांनी केला.

मुंबई विद्यापीठाने ९ ऑगस्ट रोजी सिनेट निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केला होता. 10 सप्टेंबर रोजी निवडणुका होणार होत्या आणि 13 सप्टेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार होते. मात्र काल अचानक पुढील आदेश येईपर्यंत या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. दरम्यान, आज माध्यमांशी बोलतांना आदित्य ठाकरेंनी सांगितले की, आमचे मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजपमध्ये उडी घेतली. अन्यथा त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती. आणि आता ते निवडणुकीला घाबरत आहेत. त्यामुळं त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुक स्थगित केली, अशा टीका आदित्य ठाकरेंनी केली.

जीवे मारण्याचा प्रयत्न करत प्रवाशाला लुटणारा आरोपी जेरबंद, कोतवाली पोलिसांची कामगिरी 

आदित्य म्हणाले की, यापूर्वी 2010 मध्येही युवासेनेने सिनेटची निवडणूक लढवली होती. त्यावेळी 10 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या. 2017 मध्ये 10 पैकी 10 जागा जिंकल्या. आमचा निकाल 100 टक्के लागला. आमच्यासमोर सर्व पक्ष लढत होते, तरीही आम्ही चांगल्या फरकाने जिंकलो, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

बैठक कधी आणि कुठे झाली?
बैठकीत झालेल्या निर्णयानुसार निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचं म्हटलं आहे. यावरही आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही बैठक कधी आणि कुठे झाली? या बैठकिला कोण कोण हजर होतं? बैठकीचे मेरीट्स काय आहेत? असे प्रश्न त्यांनी उपस्थित करत नेमकं असं काय झालं ही निवडणुक स्थगित करावी लागली? असा सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले, विद्यापीठ निवडणुकीला सामोरे जायला घाबरत असतील, तर काय समजायचे? एवढी फोडाफोड केली. दोन पक्ष फोडले, परिवार फोडला. महासत्ता स्थापन केली. स्वत: मुख्यमंत्री, दोन भारदस्त उपमुख्यमंत्री सोबतीला. ही महाशक्ती सोबत असून मुंबई विद्यापीठामध्ये सरकार निवडणूक घेऊ शकत नसतील, डरपोक असतील तर काय उपयोग, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube