Kangana Ranaut Slapped Controversy: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतचे (Kangana Ranaut) कानशिलात लगावली हे प्रकरण जोरदार चर्चेत आहे. चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या (CISF) एका महिला कॉन्स्टेबलने अभिनेत्रीला कानशिलात मारली होती. आता महिला कॉन्स्टेबलने कंगना राणौतला कानशिलात का मारली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कंगनाला कानशिलात मारल्यानंतर स्वतःच महिला कॉन्स्टेबलनेच संपूर्ण सत्य सांगितले आहे.
Watch: Female CISF officer who allegedly misbehaved with BJP leader and newly elected MP from Mandi, Kangana Ranaut pic.twitter.com/d88CFjXKPI
— IANS (@ians_india) June 6, 2024
कंगनाला कानशिलात मारणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचे नाव कुलविंदर कौर असल्याचे सांगण्यात येत आहे. कंगनाला कानशिलात मारल्यानंतरही कुलविंदर कौर चांगलीच संतापलेली दिसली. न्यूज एजन्सी IANS ने आपल्या X अकाउंटवरून त्या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये महिला कॉन्स्टेबल म्हणत आहे की, “शेतकऱ्यांच्या आंदोलनात तिने हे वक्तव्य केले होते आणि 100-100 रुपये घेऊन बसत नाही.” ती तिथे बसली होती का? तेव्हा माझी आई शेतकऱ्यांच्या आंदोलनात बसली होती.
निलंबित महिला कॉन्स्टेबल
कंगना राणौतला कानशिलात मारल्यानंतर विमानतळावरच महिला कॉन्स्टेबल चांगलीच संतापलेली दिसली. एअरपोर्टवर कंगनाला पाहताच तिने तिला कानशिलात मारली. या घटनेनंतर कंगना राणौतने कुलविंदरवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलवर तत्काळ कारवाई करण्यात आली आहे. CISF ने कडक कारवाई करत कुलविंदर कौरला निलंबित केले आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
Kangana Ranaut: CISF गार्डने कंगनाच्या कानशिलात लगावली? चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं?
कानशिलात मारण्याच्या घटनेनंतर कंगना काय म्हणाली?
कानशिलात मारण्याच्या घटनेनंतर कंगना राणौतचे वक्तव्यही समोर आले आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती म्हणतेय की, मला माझ्या शुभचिंतकांचे खूप फोन येत आहेत. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की मी सुरक्षित आहे. चंदिगड विमानतळावर आज सुरक्षा तपासणीदरम्यान हा हल्ला झाला. सिक्युरिटी चेक करून मी बाहेर येताच दुसऱ्या केबिनमधील महिला माझी वाट पाहत थांबली आणि बाजूने येऊन माझ्या कानशिलात लगावली आणि शिवीगाळ करू लागली.
कंगनाने व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, “ज्या महिलेने मला कानशिलात मारली ती सीआयएसएफ गार्ड आहे. मी तिला असे का केले असे विचारले असता तिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. पण माझी चिंता ही आहे की पंजाबमध्ये वाढत असलेला दहशतवाद आणि अतिरेकी आपण कसे हाताळणार?