Download App

MyLek: मायलेकींच्या नात्यात दुरावा? ‘मायलेक’ मधील ‘नसताना तू’ भावनिक गाणे प्रदर्शित

Nastana Tu Song Release: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मायलेक’ (MyLek Movie) सिनेमावर सध्या प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून आई आणि लेकीच्या सुंदर नात्याची गोष्ट सांगणारा हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. (Marathi Movie) सिनेमातील गाणी देखील सध्या प्रचंड व्हायरल होत (Social Media) असतानाच आता ‘मायलेक’मधील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

याअगोदर ‘असताना तू’ हे हॅपनिंग गाणे रिलीज करण्यात आले होते, जे आई-लेकीच्या नात्यातील जवळीक अधोरेखित करणारे होते. हे अनोखे नाते तुफान गाजत असताना ‘नसताना तू’ हे भावनिक गाणं रिलीज करण्यात आला आहे. आर्या आंबेकरच्या सुमधुर आवाजातील या गाण्याला क्षितिज पटवर्धनचे शब्द लाभले असून पंकज पडघनने या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. सोनाली खरे आणि सनाया आनंदवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात दोघींमध्ये दुरावा पाहायला मिळाला आहे. आई लेकीच्या नात्यात हा दुरावा का आला आहे, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.

ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत, सोनाली आनंद निर्मित, प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘मायलेक’ या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने, बिजय आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत.

Manoj Jarange चा संघर्षयोद्धा चित्रपट सेन्सॉरच्या जाळ्यात; जरांगेंनीही दिला इशारा

या गाण्याबद्दल सोनाली खरे म्हणते, ” याअगोदर देखील ‘असताना तू’ या आल्हाददायी गाण्यामधून मायरा आणि माझ्यामधील सुंदर नाते तुम्ही पाहिले. प्रेक्षकांनी या गाण्याला देखील उत्तम प्रतिसाद दिला. आता ‘नसताना तू ‘ हे भावनिक गाणेही प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे. काही कारणांमुळे या नात्यात दुरावा आला आहे. हे वय असे असते, जिथे मुलींच्या मनात चलबिचल असते, अनेक प्रश्न असतात, शंका असतात. त्यावर वेळीच चर्चा झाली नाही तर नकळत आई आणि लेकीच्या नात्यात दुरावा येऊ लागतो, हेच दाखवण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. कुटुंबातील प्रत्येकाने आवर्जून हा सिनेमा पाहावा.

follow us