Download App

मोठी बातमी! एन. डी. स्टुडिओ शासनाच्या ताब्यात, गोरेगाव फिल्मसीटीअंतर्गत होणार चालणार कामकाज…

दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा कर्जत येथील एनडी स्टुडिओ सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला.

  • Written By: Last Updated:

ND Studio under government control : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसा (Nitin Desai) यांचा कर्जत येथील एनडी स्टुडिओ (ND Studio) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला. गोरेगाव फिल्म सिटीअंतर्गत (Goregaon Film City) या स्टुडिओची देखरेख व देखभाल केली जाणार आहे. दरम्यान, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे (Vikas Kharge) यांनी गुरूवारी स्टुडिओची पाहणी केली.

मोठी बातमी! राणी लंके यांचा EVM पडताळणीसाठी अर्ज, ‘या’ बुथवरील मतांची पडताळणी होणार 

या पाहणी दौऱ्यासाठी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, उपसचिव महेश व्हावळ, मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, उपअभियंता (बांधकाम) विजय बापट, विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले, सदाभाऊ खोतांची पवारांवर बोचरी टीका… 

राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 14 नोव्हेंबर 2024 रोजी सादर केलेल्या संकल्प आराखड्याला मान्यता दिली असल्याने, यापुढे एन.डी. स्टुडिओचे दैनंदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरण, महसूल वाढ, लेखाविषयक कामे शासनाच्या वतीने महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरू राहतील. त्यामुळे या सर्व कामकाजाची माहिती घेण्यासाठी खारगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने स्टुडिओची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळई महामंडळाच्या शिष्टमंडळाने स्टुडिओत कार्यकरत असलेल्या व्यवस्थापनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसी संवाद साधून नियमित कामकाजाची पद्धतही समजून घेतली.

दरम्यान, 2 ऑगस्ट 2023 रोजी नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्येच आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने कलाविश्वात खळबळ उडाली होती.
त्यांच्या अकाली निधनानंतर कर्जत येथील एनडी स्टुडिओ या भव्य वास्तूचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता सरकारने हा स्टुडिओ ताब्यात घेतला असून आता गोरेगाव फिल्म सिटीअंतर्गत याची देखरेख व देखभाल केली जाणार आहे. या संदर्भातील सर्व निर्णय शासनाच्या अधीन असणार आहेत.

 

follow us