महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले, सदाभाऊ खोतांची पवारांवर बोचरी टीका…

  • Written By: Published:
महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले, सदाभाऊ खोतांची पवारांवर बोचरी टीका…

Sadabhau Khot On Sharad Pawar : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव करत महायुतीने (Mahayuti) पुन्हा एकदा सत्तेवर दावा केला. महायुतीच्या या लाटेत मविआचा धुव्वा उडाला. यावरून आता रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली.

… तर माझा लीड 25 हजार असता, लंकेंवर काशिनाथ दातेंचा खळबळजनक आरोप 

जशा कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यात येतात, तशा छत्र्या आंदोलनाच्या येतील. महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले, अशी खोचक टीका खोत यांनी केली.

सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. खोत म्हणाले की, मराठा समाजाला सर्वात जास्त कोणी दिले असेल तर ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले असेल. फडणवीस यांनी मराठा समाजासाठी जे-जे करता येईल, ते-ते फडणवीसांनी केलं. जशा कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यात येतात, तशा छत्र्या आंदोलनाच्या येतात. तसेच महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसलवले आहे, असं म्हणत खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

तनपुरे, वर्पेंनंतर राम शिंदेंनाही शंका! इव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी भरली रक्कम… 

पुढे बोलताना खोत म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे. महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या चाणक्या देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यांना केंद्रातील नेत्यांचा पाठिंबा आहे, प्रस्थापितांच्या बुडाला जाळ लावण्याचे काम देवा भाऊ यांन केलं, अशा शब्दात खोत यांनी फडणवीसांचे कौतूक केलं.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात तब्बल 76 लाख मते वाढली असा दावा करत निवडणूक आयोगावर टीका केली. त्यानंतर आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांवर खोत यांनी शरसंधान साधले. ते म्हणाले की, तंत्रज्ञान यायची सुरूवात झाली ती राजीव गांधींच्या काळात. काँग्रेसनेही ईव्हीएम आणले होते. आता तेच तंत्रज्ञानाला विरोध करत आहेत. तु्म्हाला पुढची पिढी अडाणी ठेवायची आहे का? जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्हाला चांगले वाटते आणि जेव्हा तुम्ही हरता तेव्हा तुम्ही EVM ला दोष देता, असं खोत म्हणाले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे ईव्हीएमविरोधात तीन दिवसीय उपोषणाला बसणार आहेत. यावर सदाभाऊ खोत म्हणाले, या वयात बाबा आढाव यांनी आंदोलन करणे योग्य नाही, आणि ते आंदोलन कोणासाठी करत आहेत, ज्यांनी महाराष्ट्र लुटला, देशाची राख रांगोळी केली, त्यांच्यासाठी आंदोलन करू नये, असा सल्ला खोत यांनी दिला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube