महाविकास आघाडीच्या पराभवाला जबाबदार कोण? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं…
Sanjay Raut Reaction On Mahavikas Aghadi Defeat : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पराभवाला नेमकं कोण जबाबदार आहे, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट वक्तव्य केलंय.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एका व्यक्तीवरती पराभवाचे खापर फोडता येत नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. शरद पवार यांच्यासारखा नेता, ज्याच्यामागे महाराष्ट्र उभा होता, त्यांना देखील अपयश आलंय. अपयशाची कारणे शोधली पाहिजे, ती कारणे ईव्हीएम मशीनमध्ये आहेत. यंत्रणेचा गैरवापर होत आहेत. घटना बाह्य कृत्यं आहेत की चंद्रचूड यांच्या न घेतलेल्या निर्णयामुळे आहेत, याचं मुख्य कारण शोधावं लागेल. महाविकास आघाडीचे अपयश आहे. व्यक्तिगत एका पक्षाचं अपयश आहे, असं मी मानायला तयार नाही.
महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी बिहार पॅटर्न वापरला जाणार? का, वाचा सविस्तर
संजय राऊत म्हणाले की, ठाण्यातून ईव्हीएम मशीन मतदान झाल्यावर संभाजीनगरला घेऊन जाऊन परत ठाण्यात फिडिंग करून आणले आहे. ते पुराव्यानिशी समोर आले आहे, चांदिवलीमध्ये सुद्धा असं घडलं. आमच्याकडे 450 तक्रारी आल्या आहेत. त्यांची दखल घेतलेली नाही. हा निकाल तसाच ठेवा. पुन्हा निवडणूक पोस्टल बॅलेट पेपर वरती घ्या आणि मग निकाल पहा, अशी मागणी राऊतांनी केलीय. आम्ही महाविकास आघाडी पोस्टल बॅलेट वरती आम्ही आघाडीवरती होतो . तो कल आणि ट्रेंड त्या त्या भागातील आहे.
आम्ही रडीचा डाव खेळत नाही. आम्ही हरलो म्हणून बोलतो, गेली दहा वर्षे आम्ही सांगतो बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. पैशाच्या जिवावर निवडणुका जिंकत असल्याचा आरोप संजय राऊत यानी केलंय. तर मराठी मत विभागणीसाठी फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा प्रश्न नाही. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर देखील आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणूस एक राहिला नाही, तर तो हमाल आणि पाटीवाल्याचा होईल हा इशारा बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता, आणि आज तेच होत आहे. ठाकरे ब्रँड खत्म व्हावा यासाठी मोदी, शहाचं कारस्थान संपुर्ण सुरु आहे. शरद पवार यांचं नाव राहू नये, असं मोदी आणि अमित शहा यांचं स्वप्न असल्याची टीका देखील संजय राऊत यांनी केलीय.
नवं सरकार स्थापनेचा धडाका; कोणत्या महिलांची आमदारांची लागणार मंत्रिपदी वर्णी?
मुख्यमंत्री कोण? हा निर्णय शेवटी दिल्लीतून होणार आहे. खऱ्या अर्थाने हा निर्णय महाराष्ट्रातच व्हायला पाहिजे. आम्ही पथ्य आणि परंपरा पाळली
मोदी आणि अमित शहा हे मुख्यमंत्री दिल्लीतून ठरवणार आहेत. हा निर्णय आज उद्या जाहीर करावाचं लागणार नाही. त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे, बहुमतासाठी त्यांना हात पसरावे लागणार नाही. दिल्लीतून मुख्यमंत्री ठरवेल तो स्वीकारावा लागेल, असं राऊत म्हणाले आहेत. मतांचं ध्रुवीकरण ही मोठी गोष्ट त्यांची ताकत राहिली. पार्टी तोडून विचारधारेच्या आधारावर खरे मोदी, शहा नेते देशाचे असते तर ही गोष्ट केली नसती. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी असे कधीच केले नाही. जे राजनीतिक आणि पार्टीमध्ये कमजोर आहेत, ते असं काम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.