महाराष्ट्रात मुख्यमंत्रि‍पदासाठी बिहार पॅटर्न वापरला जाणार? का, वाचा सविस्तर

महाराष्ट्रात मुख्यमंत्रि‍पदासाठी बिहार पॅटर्न वापरला जाणार? का, वाचा सविस्तर

Assembly Election 2024 Bihar Pattern In Maharashtra CM : राज्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) निवडणुकीचा धुराळा संपलेला आहे. पण आता सर्वांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ स्थापनेचे वेध लागलेले आहेत. महायुतीने (Mahayuti) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली (Maharashtra CM) अन् 200 पेक्षा अधिक उमेदवारांना निवडून आणण्यात यश मिळवलं. अडीच वर्षाच्या कालावधीत महायुतीने अनेक लोकोपयोगी योजना आणल्या. तसेच अनेक विकासकामे देखील केली आहेत. याचाच परिणाम निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाला.

राज्यात आता सगळ्या जनतेला मुख्यमंत्री (BJP) कोण होणार? याचे वेध लागलेले आहेत. दरम्यान राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्रि‍पदासाठी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवला जावू शकतो, अशी शक्यता वर्तवली जातेय. महाराष्ट्रात बिहारप्रमाणेच मुख्यमंत्री पॅटर्न राबवलं जावू शकतो, असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दाट शक्यता आहे.

VIDEO : ‘ढाण्या वाघ थोडक्यात वाचलास…दर्शन घे दर्शन’; अजित पवार अन् रोहित पवारांची भेट, पाहा काय घडलं?

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पद देवून, भाजपला मित्रपक्षांवर अन्याय करत नाही. हा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपचे पक्षश्रेष्ठी करू शकतात. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रात चांगली लोकप्रियता आहे, त्याचा फायदा देखील भाजपला पुढील निवडणुकांमध्ये होवू शकतो. पुढील तीन महिन्यांत महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजयी चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेचा नक्की भाजपला फायदा होईल.

नवं सरकार स्थापनेचा धडाका; कोणत्या महिलांची आमदारांची लागणार मंत्रि‍पदी वर्णी?

राज्यात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला असून केंद्रातील सर्वोच्च नेतृत्वाने दूरदृष्टीने निर्णय घेतले आहेत. विजयाचं समीकरण कायम ठेवत महायुती भक्कम ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे कदाचित राजकीय समीकरण म्हणून महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार नसल्याची शक्यता आहेत. तर 2019 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी भाजप दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे ठाकरे खोटं बोलतात, हे सिद्ध करण्यासाठी कदाचित भाजप पुन्हा एकनाथ शिंदे यांना संधी देवू शकतं.

भाजपकडून विजयाचे श्रेय आणि मित्रपक्षांना समान संधी दिली जाते. त्याचप्रमाणे राज्यात आणि केंद्रात मित्रपक्षांना भाजपकडून सन्मानाची वागणूक दिली जाते, हे सिद्ध करण्यासाठी देखील मुख्यमंत्रि‍पदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागते. या सर्व कारणांमुळेच राज्यात भाजपला बहुमत मिळालेलं असताना देखील मुख्यमंत्रि‍पदासाठी बिहार पॅटर्न वापरला जावू शकतो, अशी शक्यता आहे. परंतु अजून भाजपकडून मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube