VIDEO : ‘ढाण्या वाघ थोडक्यात वाचलास…दर्शन घे दर्शन’; अजित पवार अन् रोहित पवारांची भेट, पाहा काय घडलं?
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video Viral : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार (Ajit Pawar) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांची भेट झालीय. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी ते कराडमधील प्रीतीसंगमावर आले होते. दरम्यान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी काका-पुतण्याची भेट झाली आहे. यावेळी रोहित पवारांनी थेट अजित पवारांच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचं व्हिडिओत (Maharashtra Assembly Election 2024) दिसतंय.
तुम्ही माझ्यासारखा प्रामणिक माणूस गमावला; सुरेश धस असं का म्हणाले?, पंकजा मुंडेंवर का आरोप केले?
प्रीतीसंगमावर अजित पवार यांनी रोहित पवार यांना मिश्कील टोला लगावला आहे. ढाण्या वाघ थोडक्यात वाचला, माझ्या सभा झाल्या असत्या तर काय झालं असतं, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. थोडक्यात वाचलास, दर्शन घे दर्शन घे असं ते रोहित पवार यांना म्हटलंय. तर रोहित पवार यांनी आपले काका अजित पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आहेत.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी प्रितीसंगम म्हणजे पवित्र स्थळ. चव्हाण साहेबांनीच एक सुसंस्कृत अशी राजकीय संस्कृती जपण्याचे संस्कार महाराष्ट्रावर केले. त्यानुसारच आज प्रितीसंगमावर आदरणीय अजितदादांची भेट झाली. त्यांची राजकीय वाटचाल स्वतंत्र दिशेने सुरु असली तरी त्यांचा राजकीय… pic.twitter.com/Oc8eQYdwfN
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 25, 2024
दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार माझे काका आहेत. त्यामुळे मी त्यांच्या पाया पडलो. आमच्या विचारांमध्ये अजूनही भिन्नता आहे. माझ्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माझी खूप मदत केली होती, असं देखील अजित पवार म्हणालेत. यावेळी अजित पवार यांनी बेस्ट ऑफ लक म्हणत रोहित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नवं सरकार स्थापनेचा धडाका; कोणत्या महिलांची आमदारांची लागणार मंत्रिपदी वर्णी?
यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांसोबत बोलताना माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती असं म्हटलंय. यावर रोहित पवार म्हणाले की, नक्कीच अजित पवार यांची सभा झाली असती तर उलटही होऊ शकलं असतं. परंतु ते बारामतीत अडकून पडले असते, त्यांना माझ्या मतदारसंघामध्ये येता आलं नाही. ते मोठे नेते आहेत. निर्णय त्यांचा असून मोठ्या प्रमाणावर त्यांचे आमदार देखील निवडून आलेत. ही चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदन देखील केलंय.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी प्रितीसंगम म्हणजे पवित्र स्थळ. चव्हाण साहेबांनीच एक सुसंस्कृत अशी राजकीय संस्कृती जपण्याचे संस्कार महाराष्ट्रावर केले. त्यानुसारच आज प्रितीसंगमावर आदरणीय अजितदादांची भेट झाली. त्यांची राजकीय वाटचाल स्वतंत्र दिशेने सुरु असली तरी त्यांचा राजकीय अनुभव आणि वयाचा कायमच आदर आहे. त्यानुसार आजच्या भेटीदरम्यानही निवडणुकीतील यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद घेतले, अशी सोशल मिडिया पोस्ट रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर केलीय.