Download App

Naal 2: ‘नाळ भाग 2′ चित्रपटातील ‘भिंगोरी’ पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘Naal Part 2 Song Out: 2018 नाळमधील (Naal ) चैतू आता मोठा झाला आहे. प्रदर्शित झालेला ‘नाळ’ (Naal Part 2 ) सिनेमा चांगलाच धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळाले होते. राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळालेल्या या सिनेमाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली होती. ‘चैत्या’चे बोबडे बोल सर्वानाच आवडले होते, (Social media) त्या सिनेमातील गाणी देखील प्रचंड लोकप्रिय झाली. आता ‘नाळ भाग 2’ प्रदर्शनाच्या वाटेवर असताना या सिनेमातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या गाण्याचे ‘भिंगोरी’ असे बोल असून ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केल आबे जात आहे. तर या सुरेल गाण्याला मास्टर अवन, कडूबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांचा गोड आवाज लाभला आहे. झी स्टुडिओ आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ भाग 2’ 10 नोव्हेंबर दिवशी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2018 मध्ये ‘नाळ’मध्ये विदर्भातील नदीचं विस्तीर्ण पात्र बघायला मिळालं होतं. त्या पात्रात पाणी कमी, आणि वाळवंट जास्त होतं. असं असून देखील पडद्यावर विदर्भ कधी नव्हे इतका विलोभनीय बघायला मिळाला होता. ती कमाल होती सुधाकर रेड्डी यक्कंटी यांच्या कॅमेराची. तर अशा रखरखीत वातावरणात देखील माया करणाऱ्या माणसांच्या सावलीमध्ये चैतू घडत गेल्याचे बघायला मिळाला होता.

आता ‘नाळ २’ मध्ये मोठा झालेला चैतू आपल्या खऱ्या आईला भेटायला पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्याचे बघायला मिळणार आहे. ‘भिंगोरी’ या गाण्यातून नजरेत भरतं ते पश्चिम महाराष्ट्रात डोंगरा- डोंगरानी वेढलेल्या गावाचं निसर्गसौंदर्य आणि या गावात आलेल्या चैतूला बघून आनंदीत झालेले गावकरी. निसर्गाचं हिरवंगार रुप आणि गावकऱ्यांचं प्रेम बघून भारावलेला चैतू खऱ्या आईला पाहण्यासाठी तो तिथं आल्याचे दिसत आहे, परंतु इथून पुढे त्याच्या हा प्रवास नेमका कुठवर जाऊन थांबतो, याची रंजक अशी कहाणी सिनेमात बघायला मिळणार आहे.

तेलगी घोटाळ्यात कोणत्या राजकीय नेत्यांचा सहभाग? ‘Scam 2003 Part 2’चा ट्रेलर प्रदर्शित

‘जाऊ दे ना वं’ या पहिल्या भागातील लोकप्रिय गाण्यानंतर आता ‘भिंगोरी’ या गाण्यातून चैतूच्या या प्रवासाची सुरुवात बघायला मिळत असल्याचे दिसत आहे. नात्यांमधले चढ-उतार आणि गुंता हा चैतूच्या अल्लड वयाला कोणत्या पद्धतीने पेलणार आहे का?असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडत असल्याचे दिसत आहे. दिवाळीत १० नोव्हेंबर दिवशी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘नाळ’चा दुसरा भाग चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे, तेव्हा प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.

Tags

follow us