तेलगी घोटाळ्यात कोणत्या राजकीय नेत्यांचा सहभाग? ‘Scam 2003 Part 2’चा ट्रेलर प्रदर्शित
Scam 2003 Part 2 Trailer Out: पहिला भागाच्या यशानंतर, स्कॅम 2003: द तेलगी स्टोरीचा (Scam 2003 The Telgi Story Part 2) पुढचा भाग 2 प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. (Social media) सध्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. निर्माते हंसल मेहता (Hansal Mehta) यांची ‘स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी’ ही सीरिज गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आली आहे. या सीरिजमध्ये देशातील सर्वात मोठा तेलगी घोटाळा दाखवण्यात आला आहे.
View this post on Instagram
‘स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी व्हॉल्युम २’ या सीरिजमध्ये कर्नाटकातील खानापूर येथील तेलगी या फळ विक्रेत्याचा जीवन प्रवास दाखवण्यात आल्याचे बघायला मिळाले आहे. फळ विक्रेता ते १८ राज्यांमध्ये पसरलेल्या आणि संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या भारतातील सर्वात कल्पक घोटाळ्यांपैकी एकाचा मास्टरमाइंड बनण्याचा त्याचा प्रवास या सिनेमात दाखवला आहे. आता या सीरिजचे पुढील भाग चाहत्यांच्या लवकरच भेटीला येणार आहे.
‘स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी व्हॉल्युम २’मध्ये आता काही मोठ्या हालचाली झाल्याचे बघायला मिळणार आहे. तेलगी घोटाळ्यात नेमके कोण कोणते राजकीय नेत्यांचा सहभाग आहे? याबद्दल काही माहिती समोर येणार आहे का? असा प्रश्न सध्या चाहत्यांना पडला आहे. सीरिजच्या आगामी भागात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चाहत्यांना लवकरच पडद्यावर मिळणार आहे.
UT 69 Trailer: राज कुंद्राचे आर्थर रोड जेलमधील अनुभव दाखवणारा, ‘UT 69’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
हंसल मेहता दिग्दर्शित स्कॅम २००३ ही सीरिज २ सप्टेंबर २०२३ दिवशी प्रदर्शित झाली होती. या सीरिजचे काही भाग प्रदर्शित करण्यात आले होते. आता या सीरिजचे सर्व भाग ३ नोव्हेंबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये या सीरिजबद्दल मोठी उत्सुकता लागल्याचे बघायला मिळत आहे. या सीरिजमध्ये गगन देव रियार, सना अमीन शेख, भावना बलसावेर, भरत जाधव, जे.डी. चक्रवर्ती, भरत दाभोळकर, शशांक केतकर, तलत अजीज, निखिल रत्नपारखी, विवेक मिश्रा, हिता चंद्रशेखर, अजय जाधव, दिनेश लाल यादव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहेत.