UT 69 Trailer: राज कुंद्राचे आर्थर रोड जेलमधील अनुभव दाखवणारा, ‘UT 69’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

UT 69 Trailer: राज कुंद्राचे आर्थर रोड जेलमधील अनुभव दाखवणारा, ‘UT 69’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

UT 69 Trailer Out: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आला होता. 2021 मध्ये पोलिसांनी राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणामुळे (Pornography case) अटक करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये राज कुंद्रला जामीन मंजूर करण्यात आला. आता लवकरच राज कुंद्रा हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. राज कुंद्राचा ‘UT 69’ हा सिनेमा चाहत्यांच्या लवकरच भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Kundra (@onlyrajkundra)


‘UT 69’ या सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला ‘पॉर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक केल्याची बातमी सुरुवातीला दिसत आहे. त्यानंतर ट्रेलरमध्ये राज हा आर्थर रोड जेलमध्ये जातो. आर्थर रोड जेलमध्ये राज कुंद्राला नेमके कोणत्या गोष्टींचा अनुभव आला आणि तुरुंगामधील जीवनप्रवास यावर आधारित ‘UT 69’ हा सिनेमा असणार आहे.

राज कुंद्रानं UT 69 या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, “माझे आयुष्य रोलर कोस्टरसारखे होते. त्याचा एक भाग तुमच्यासोबत शेअर करत आहे.

तसेच त्याच्या पत्नीने म्हणजेच शिल्पा शेट्टीनं देखील UT 69 या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिल्पानं ट्रेलर शेअर करत असताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “ऑल द बेस्ट कुकी, तू एक धाडसी माणूस आहे. यामुळे मला तुझ्याबद्दल कौतुक वाटते!” राज कुंद्राचा UT 69 हा सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. शाहनवाज अली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात राज कुंद्राचा अभिनय बघण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक झाले आहेत.

क्राईम अन् सस्पेन्सने भरलेला ‘SAJINI Shinde Ka Viral Video’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. जवळपास 2 महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला 21 सप्टेंबर 2021 दिवशी अखेर जामीन मिळाला. नंतर राज कुंद्रा हा चेहऱ्यावर मास्क घालून अनेक विविध कार्यक्रमाला हजेरी लावत होता. आता UT 69 या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये राजचा चेहरा प्रेक्षकांना पुन्हा एकदा दिसणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube